Join us  

बी टाऊनचा ‘वस्त्रोद्योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2015 2:35 AM

बॉलीवूडमधील तारे-तारका फक्त चित्रपटातच काम करतात असे नाही, तर त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात. हॉटेल, शेती, प्रोडक्शन हाऊस, इंटेरिअर डेकोरेशनसोबतच अनेक स्टार्स

बॉलीवूडमधील तारे-तारका फक्त चित्रपटातच काम करतात असे नाही, तर त्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्रोत असतात. हॉटेल, शेती, प्रोडक्शन हाऊस, इंटेरिअर डेकोरेशनसोबतच अनेक स्टार्स फॅशन क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपन्यांच्या वस्त्रांचे ब्रॅण्डिंग करीत आहेत. एकाहून एक सुंदर प्रकारचे पोषाख बॉलीवूड स्टार्सच्या नावाने विकण्याचा एक नवाच ट्रेंड आला आहे. अनेक चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेता-अभिनेत्रीच्या नावाने उत्पादित कापडाचे विशेष आकर्षण असते. चाहत्यांचे हेच आकर्षण कॅश केले जात आहे. अभिनेत्यांच्या या वस्त्रोद्योगाचा हा रंजक आढावा...अलिया भट : फॅशन ब्रॅँड लाँच करण्यात अलिया भटसारख्या नवोदित अभिनेत्रीचाही नंबर वरचा आहे. कमी वयात बॉलीवूडमध्ये आपले स्थान बळकट करणारी अभिनेत्री म्हणून अलियाचे नाव घेतले जाते. फॅशन लाइनमध्ये यायला अलियाने इतर अभिनेत्रींइतका अजिबात वेळ घेतला नाही. तरुणाईची नाळ कळलेल्या अलियाने विंटर कलेक्शन लॉँच केले आहे. यासाठी तिने एका मोठ्या आॅनलाइन वेबसाइटशी करारही केला आहे. करिना कपूर : करिनाने आपली ‘सिग्नेचर डेनिम बेबो’ लॉँच केली होती. बेबोचे कपडे आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वात महागडे कपडे म्हणून ओळखले जातात. चाहत्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.दीपिका पदुकोननुकतेच दीपिकाने एका मोठ्या आॅनलाइन फॅशन वेबसाइटबरोबर मिळून ‘आॅल अबाऊट यू बाय दीपिका पदुकोन’ लॉँच केले आहे. याबाबत सांगताना ती म्हणते, की मला नेहमी साधे आणि आरामदायी कपडे घालायला आवडतात. लहानपणी माझी आईदेखील या गोष्टीची काळजी घ्यायची. त्यामुळेच माझ्या असे लक्षात आले, महागडे कपडे घेणाऱ्यांना बाजारात अनेक पर्याय असतात, पण मध्यम बजेट असणाऱ्यांची बरेचदा गैरसोय होते. म्हणून मी खासकरून माझ्या चाहत्यांसाठी ‘आॅल अबाऊट यू’ ब्रॅँड लॉँच केला आहे. हृतिक रोशन : हृतिकने दोन वर्षांपूर्वी ‘एचआरएक्स फॅशन ब्रॅँड’ लॉँच केला होता. तो म्हणाला, की मी माझ्या एचआरएक्ससाठी दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आहे. माझ्या स्टाईलने प्रभावीत झालेल्या माझ्या चाहत्यांना सर्वोत्तम दर्जाचे कपडे मिळावेत यासाठी मी प्रयत्नशील असतो, असे तो सांगतो.सलमान खान : सलमान खानने त्याच्या ‘बीइंग ह्युमन’ या संस्थेतर्फे चाहत्यांसाठी टीशर्ट, शर्ट आणि इतर वस्तूंच्या विक्रीचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याने देशभरात डेहरादून, इंदोर, मुंबई, गुजरात या ठिकाणी याच नावाने स्टोअर सुरू केले आहे. या दुकानांमध्ये फॅशनचे कपडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.कंगना राणावत : बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणून कंगनाचा उल्लेख केला जातो. त्यामुळे तिच्या स्टाईलचे आकर्षक कपडे आता ती चाहत्यांना देण्यास उत्सुक आहे. लवकरच ती एक फॅशन ब्रॅँड लॉँच करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.