'टाईमपास' फेम प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर या दोघांच्या लग्नाची धामधून सध्या सुरु आहे. प्रथमेश - क्षितीजा (Kshitija Ghosalkar) उद्या २४ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांनी काहीच दिवसांपुर्वी साखरपुडा केला. याशिवाय त्यांच्या हळदी - मेहंदी सेरेमनीचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले. अशातच लग्नाच्या पूर्वसंध्येला क्षितीजाने सोशल मीडियावर तिच्या घराचे फोटो पोस्ट करत भावूक पोस्ट लिहीली आहे.
क्षितीजा लिहीते, "Dear Home Sweet Home, आज सजलेल्या मंडपाने किती छान दिसतंय माझं घर.. आजपर्यंत , तुझी "माझं घर", अशी असलेली ओळख आता "माझं माहेर", अशी होणार.. आणि आता अवघ्या काही तासांतच मी तुझा निरोप घेणार.. तुझ्या प्रत्येक कोपऱ्याशी असलेल्या आठवणींना आज जणू खाज एक चेहराच मिळालाय!!बघ ना, काही मनसोक्त हसतायत.. काही अलवार रडतायत..काहींमध्ये मला माझं बालपण दिसतंय, तर काहींमध्ये मी सासरी जाणार म्हणून होणारी घालमेल!!! त्या सगळ्यांना मी माझ्या हृदयाच्या कुपीत कायम जपून ठेवणार!