Join us  

‘बेगम जान’ विद्या बालन म्हणते, ‘माय बॉडी, माय हाऊस , माय कन्ट्री, माय रूल्स’

By admin | Published: March 08, 2017 5:21 AM

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘बेगम जान’ या चित्रपटात दिसणार आहे. विद्याचे चाहते या चित्रपटाची आतूरतेने प्रतीक्षा करीत आहेत.

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘बेगम जान’ या चित्रपटात दिसणार आहे. विद्याचे चाहते या चित्रपटाची आतूरतेने प्रतीक्षा करीत आहेत. अशाच ‘बेगम जान’चे एक नवे पोस्टर मेकर्सनी शेअर केले आहे. या पोस्टरद्वारे सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यात विद्या यशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल. या चित्रपटात विद्याची भूमिका किती आगळी-वेगळी असेल, याची एक झलक या पोस्टरमधून आपल्याला पाहायला मिळतेय. पोस्टरमध्ये विद्या एका खुर्चीवर बसली आहे. करड्या रंगाचे डोळे,मोकळे केस आणि चेहऱ्यावर बिनधास्त भाव अशा या पोस्टरखाली लिहिले आहे, ‘माय बॉडी, माय हाऊस , माय कन्ट्री, माय रूल्स’. हा चित्रपट ‘राजकहिनी’ या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाच्या बंगाली व्हर्जनमध्ये रितुपर्णा सेनगुप्ता दिसली होती. हिंदी रिमेकमध्ये ही भूमिका विद्या साकारताना दिसणार आहे. स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या फाळणीकाळातील ही कथा आहे. चित्रपटाची कथा एका कुंठणखान्याच्या अवती-भवती फिरणारी आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान देहविक्रय व्यवसायात फसलेल्या महिलांच्या आयुष्यातील उलथा-पालथ या चित्रपटातून पडद्यावर दिसणार आहे. सर्वात विशेष म्हणजे, यात एक नाही, दोन नाही तर तब्बल ११ अभिनेत्री दिसणार आहे. विद्या बालन, नसिरुद्दीन शहा, रजत कपूर व गौहर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला बेगम जान हा चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी याने केले असून हा चित्रपट १४ एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. निमार्ता महेश भट्ट व मुकेश भट्ट यांच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेला ‘बेगम जान’च्या माध्यमातून दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी बॉलिवूडमध्ये पर्दापण करीत आहेत.