'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची सध्या खुप उत्सुकता आहे. हा सिनेमा रणदीप हूडाच्या आजवरच्या करिअरमधील महत्वाचा चित्रपट म्हणून पाहिला जातोय. रणदीपने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात वीर सावरकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील पडद्यामागील एक व्हिडीओ समोर आलाय. यात रणदीपच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू दिसून येत आहेत.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओत पाहायला मिळतं की 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात असलेल्या काही प्रसंगांच्या शुटींगच्या वेळेची परिस्थिती दिसते. यामध्ये अंदमान सेल्युलर जेलचा प्रसंग, मार्सेलिस समुद्रात मारलेली उडी, सावरकरांनी लोकांमध्ये केलेलं जाहीर भाषण अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या प्रसंगाचं चित्रण करताना रणदीप एकेक शॉट घेण्यासाठी किती मेहनत करतोय हे पाहायला मिळतंय.
हा व्हिडीओ पाहताना असंही लक्षात येतं की, दिग्दर्शन म्हणून जबाबदारी सांभाळताना रणदीप क्वचित समयी त्याच्या सहकाऱ्यांवर चिडताना दिसतोय. त्याला काहीवेळेस रागही आलेला दिसतोय. अशाप्रकारे रणदीपने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' साठी किती मेहनत घेतलीय याचा अंदाज येईल. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने २५ कोटींंहून जास्त गल्ला जमावलाय. सिनेमातील रणदीपच्या अभिनयाचं खुप कौतुक होताना दिसतंय.