Join us

आरारा रा खतरनाक...! 'बेखयाली...' गाणं शाहिद कपूरचं, पण गाण्यात दिसताहेत अश्विनी भावे व अशोक सराफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:19 IST

शाहिद कपूरच्या बेखयाली गाण्याचं अनोखं व्हर्जन पहा.

शाहिद कपूरचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कबीर सिंग' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. कबीर सिंग चित्रपटाला घेऊन चाहत्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे. एक वर्ग असा आहे ज्याला कबीर सिंगमध्ये शाहिदचा अभिनय खूप भावला तर दुसरा वर्ग असा आहे ज्यांना चित्रपट महिला विरोधी वाटला. सध्या या चित्रपटातील काही व्हिडिओ व मीम्स व्हायरल होत आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे कबीर सिंगमधील गाजलेलं गाणं 'बेखयाली'वर अशी ही बनवा बनवी सिनेमातील काही सीनचे वापर करून रिक्रिएट करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेखयाली गाण्याचं रिक्रिएट अशी ही बनवा बनवी चित्रपटातील अभिनेत्री अश्विनी भावे यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहे आणि सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू येईल.

शाहिदचा हा सर्वात मोठी ओपनिंग मिळालेला पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाने आतापर्यंत खूपच चांगला गल्ला बॉक्स ऑफिसवर मिळवला आहे. या सिनेमातील शाहिदच्या भूमिकेवर भलेही टीका होत असली तरी सुद्धा या चित्रपटगृहातील गर्दी मात्र जराही कमी झालेली नाही. या सिनेमाची कथा, गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या सिनेमातील शाहिदच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक होत आहे.

तसेच या चित्रपटातील कियाराची भूमिका देखील प्रेक्षकांना भावली आहे. या सिनेमातील शाहिदचे अनेक डायलॉग्स प्रचंड फेमस झाले आहेत. कबीर सिंग प्रदर्शित झाल्यानंतर केवळ 13 दिवसांत या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक गल्ला जमवला आहे.

टॅग्स :कबीर सिंगशाहिद कपूरअशोक सराफअश्विनी भावे