कोलकाता- बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पायल चक्रबर्ती ही सिलिगुडीतल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी मृतावस्थेत सापडली आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. रिपोर्टनुसार, प्राथमिकदृष्ट्या तिनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. दक्षिण कोलकाताच्या असलेल्या पायलनं सिलीगुडी चर्च रोडवरील एका हॉटेलमध्ये काल संध्याकाळी चेक इन केलं होतं.हॉटेल कर्मचा-यांच्या माहितीनुसार, आज सकाळी पायल गंगटोकसाठी रवाना होणार होती. तसेच बुधवारीही पायल हॉटेलमधून बाहेर पडली नव्हती. ती हॉटेलमध्ये आली तेव्हापासूनच तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंदच होता. अनेकदा दरवाजा ठोकावूनही आतून काहीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचा-यांनी पोलिसांना सगळा प्रकार सांगितला.
धक्कादायक! हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडली 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 17:12 IST