बंगाली अभिनेत्री (Bengali actress) आणि तृणमुल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आणि तिचे पती निखिल जैन यांच्या वैवाहिक नात्यात कटुता आली आहे. दोन महिन्यांपूर्वी यावरून सिनेक्षेत्रासह राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. निखिल जैनने नुसरतच्या पोटात असलेल्या मुलाचा बाप नसल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. तसेच सहा महिन्यांपासून आपण एकत्रही राहत नसल्याचे म्हटले होते. नुसरत जहाँ ही प्रेग्नंट असून हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. (Bengali actress and TMC MP Nusrat Jahan is reportedly admitted to the hospital and is expected to give birth to her first child on Thursday.)
नुसरत जहाँला एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी तिला 26 ऑगस्टची डिलिव्हरी डेट दिली आहे. आनंद बाजार वृत्तपत्रानुसार आज नुसरतला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तिची डिलिव्हरी डेट होती.
वादाशी नाते... नुसरत जहाँ हिने २०१९ मध्ये उद्योगपती निखिल जैन याच्याशी विवाह केला होता. नुसरत जहाँ हिने स्वत:च आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र आता नुसरत जहाँ ही हा विवाह वैध नसल्याचे सांगत आहे. गेल्या काही काळापासून नुसरत आणि निखिल यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या येत होत्या. आपण एकत्र राहत नसल्याचे नुसरतचा पती निखिल याने सांगितले आहे. याचदरम्यान नुसरत गर्भवती असल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना निखिलने याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे तसेच ती गर्भवती असेल तर ते मुल त्याचे नसल्याचे म्हटले होते.
दुसरीकडे नुसरतच्या मुलाचा बाप कोण, यावरून चर्चा सुरु झाली होती. अभिनेता यश दासगुप्ताला ती डेट करत होती. मंगळवारीच दोघांनी एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. यामुळे ते दोघे फिरायला गेले होते, असे म्हटले जात आहे. आता मुलाला जन्म दिल्यावर त्याचा खरा पिता कोण ते कळण्याची शक्यता आहे. (Who is the Real Father of Nusrat Jahan's Child? Nikhi Jain or Yash Dasgupta.)