मुंबई पुणे मुंबई 3 मुंबई पुणे मुंबई 3 हा मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाचा तिसरा भाग असून या चित्रपटात स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, स्वप्निल, मुक्ता आणि प्रशांत दामले यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांच्या मनाला भावली.
नाळनाळ हा चित्रपट आई आणि मुलाचे यावर बेतलेला आहे. एका छोट्या मुलाचे त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे... एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तो आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या आयुष्यात रममाण असतो. पण त्याच्या आईवडिलांनी दत्तक घेतले असल्याचे त्याला अचानक कळते. यानंतर या मुलाच्या मनाची घालमेल कशी होते हे प्रेक्षकांना नाळ या चित्रपटात पाहायला मिळाले होते. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, देविका दफ्तरदार, नागराज मंजुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
फर्जंदशिवाजी महाराजाच्या फर्जंद या मावळ्याची गाथा प्रेक्षकांना फर्जंद या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, अस्ताद काळे, निखिल राऊत, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे या सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती.
मुळशी पॅटर्न मुळशीतील शेतजमीन विकल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली होती. त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावे लागले याचे चित्रण खूप चांगल्याप्रकारे मुळशी पॅटर्न या चित्रपटात करण्यात आले होते. या चित्रपटात ओम भूतकर, महेश मांजरेकर, मोहन जोशी, प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिका होत्या.
आणि डॉ. काशिनाथ घाणेकरआणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटात प्रेक्षकांना दिग्गज अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटातील नंदिता धुरी, वैदही वैदही परशुराम या कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर ही व्यक्तिरेखा सुबोध भावे अक्षरशः जगला आहे. त्याने प्रत्येक दृश्यात त्याच्या अभिनयाने एक जिवंतपणा आणला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे होते.