Join us

भाग्यश्री लिमियेचा हा व्हिडीओ पाहिला नाही तर काय पाहिलं? पाहून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 17:33 IST

Bhagyashree Limaye : मध्यवर्गीय दिवाळी असं कॅप्शन देत भाग्यश्रीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

दिवाळीचा सण जवळ येऊ लागताच लोकांमधील उत्साह, आनंद आणि उल्हास वाढत जातो. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी करण्याकडे ब-याच जणांचा कल असतो. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. सध्या तर कलाकारांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. मराठी सेलिब्रिटींचे अनेक इन्स्टा रिल सध्या जाम चर्चेत आहेत. त्यातल्या त्यात मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये  (Bhagyashree Limaye) हिचा दिवाळी रिलची तर भारी चर्चा आहे. मध्यवर्गीय दिवाळी असं कॅप्शन देत भाग्यश्रीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात सुमित पाटीलही तिच्यासोबत आहे.  यामध्ये भाग्यश्री हिंदी गाणं मुझे तुमसे कितने गिले..क्या किया... यावर लिपसिंग करताना दिसत आहे. यावर सुमितचं धम्माल उत्तर ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही....

‘ पहिल्या चकल्या केल्या...मग बांधले लाडू... आता चिवडा केलाये... विषय नको काढू....,’ असं झक्कास उत्तर तो देतो. भाग्यश्री आणि सुमितचा हा फनी व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. चाहत्यांनी यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. हसू आवरतं नाहीये..., अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली आहे. तर अनेकांनी पंखे नाही पुसले? चकल्या नाही तळल्या? असे मजेशीर प्रश्न केले आहेत. झक्कास, एक नंबर, लय भारी अशा आशयाच्या कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत. भाग्यश्रीने 2017  मध्ये ‘घाडगे & सून’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेत तिने साकारलेली अमृता प्रभुणेची भूमिका चांगलीच गाजली. त्यापूर्वी 2014  मध्ये तिने ‘श्रावण क्वीन’चा किताब जिंकला होता. अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी ती आयटी कंपनीत नोकरी करत होती. 

टॅग्स :भाग्यश्री लिमेय