Join us

व्हायरल MMS प्रकरणा पहिल्यांदा बोलली अक्षरा सिंह; अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 9:14 PM

३१ वर्षीय अभिनेत्री अक्षराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टेलिग्राम, रेडीट सारख्या माध्यमावर हा तुफान व्हायरल झाला आहे.

भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सतत कुठल्या ना कुठल्या कारणास्तव चर्चेत असते. आपल्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त गोष्टींमुळेच ती चर्चेत असते. सध्या एका एमएमएस व्हायरल झाल्यामुळे ती चर्चेत आहे. अक्षराचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत एमएमएस लीक झाला आहे. यापूर्वीही तिचा अश्लील एमएमएस व्हायरल झाला होता. आता, या सर्व घटनांवर अक्षराने पहिल्यांदाच मौन सोडलंय.

३१ वर्षीय अभिनेत्री अक्षराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टेलिग्राम, रेडीट सारख्या माध्यमावर हा तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील महिला ही अभिनेत्री अक्षरा असल्याचं चाहते सांगत आहेत. तर, तिच्या चाहत्यांनाही या एमएमएस लीकप्रकरणाचा त्रास होतोय. याप्रकरणी अक्षराने एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत परखडपणे मत मांडलंय. 

एमएमएसची बातमी चुकीची असून निराधार आहे. सन २०१८ पासून इंडस्ट्रीजचा एक गट मला बदनाम करण्याचं काम करतोय. माझ्या करिअरमधील सुरुवातीच्या दिवसांपासून ह्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. मी जेव्हा स्ट्रगल करत होते, तेव्हापासून. मात्र, मी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. पण, माझ्या या गप्प बसण्याचाच लोकांनी गैरफायदा घ्यायला सुरू केलंय, असं मला वाटत आहे, असे अक्षराने म्हटलं आहे. मात्र, आता ह्या गोष्टी मी सहन करणार नाही, असेही तिने म्हटलंय. 

याप्रकरणी मी आता कायदेशीर कारवाई करणार आहे. माध्यमांना कुठलीही शहानिशा न करता याबाबत बातम्या दिल्या. पानी डोक्यावरुन गेलंय. काही लोकांना वाटतं की, मी दुसरी आकांक्षा दुबे व्हावे, अशा शब्दात अक्षराने आपली भूमिका मांडलीय.  

टॅग्स :सोशल व्हायरलपोलिसव्हायरल फोटोज्