‘मध्यमवर्ग हा मराठी चित्नपट येत्या 12 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. निर्मात्या लक्ष्मी बाबाजी आंजर्लेकर व संजय गोपाळ छाब्रिया निर्मित या चित्नपटाचे लेखक -दिग्दर्शक हॅरी फर्नांडिस आहेत. वसन आर्ट्स मिडीया प्रा.लि. आणि सी. पी. आय. मुव्हीज चे सुजित तिवारी या चित्नपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे हिंदी आणि भोजपुरी सुपरस्टार रवि किशन पहिल्यांदाच या चित्नपटातून मुख्य भूमिका साकारताहेत. रवि किशन यांच्यासोबत सिद्धार्थ जाधव इन्स्पेक्टरच्या दमदार भूमिकेत प्रेक्षकांसमोर येताहेत. अनंत जोग, नयना आपटे, सुजाता जोशी , कश्मिरा कुलकर्णी, हेमांगी काझ , किशोर नांदलस्कर, वसंत आंजर्लेकर, रमेश वाणी, अनिल गवस, अॅलन फर्नांडिस, तन्वी मेहता, राज खत्नी आदी नामवंत कलाकारांच्या यात भूमिका आहेत. चित्नपटाची कथा-पटकथा- संवाद हॅरी फर्नांडिस यांनी लिहिले आहेत. मध्यमवर्ग ळए टकऊऊछए उछअरर मध्ये बाबासाहेब सौदागर, सावता गवळी, हॅरी फर्नांडिस यांनी वैविध्यपूर्ण गीते लिहिली असून संगीतकार गुणवंत सेन यांनी संगीत दिलंय. यातील गीत बप्पी लहरी, कल्पना यांनी गायलं असून परिवार हे गीत गायकांसोबत कलाकारांच्या ही आवाजात आहे.