कॅन्सरमुळे झाले होते भूमी पेडणेकरच्या वडिलांचं निधन, इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी असा केला होता संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:46 PM2021-03-08T17:46:17+5:302021-03-08T17:54:01+5:30

भूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

Bhumi pednekar reveals she lost her father to cancer at an early age | कॅन्सरमुळे झाले होते भूमी पेडणेकरच्या वडिलांचं निधन, इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी असा केला होता संघर्ष

कॅन्सरमुळे झाले होते भूमी पेडणेकरच्या वडिलांचं निधन, इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी असा केला होता संघर्ष

googlenewsNext

भूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भूमी सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी संवादही साधत असते. रुपेरी पडद्यावर भूमीचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज आपण पाहिला आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती.  खूप कमी लोकांना माहिती आहे की या यशासाठी भूमिला संघर्ष करावा लागला आहे. फिल्मीबिटच्या रिपोर्टनुसार भूमी 18 वर्षांची असता तिच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. भूमीच्या वडिलांचे कॅन्सरमुळे निधन झाले. भूमीची लहान बहिण समीक्षा तेव्हा 15 वर्षांची होती. यानंतर तिच्या आई सिंगल मदर म्हणून दोनही बहिणींना मोठे केले.

रिपोर्टनुसार भूमी म्हणाली वडिलांच्या निधनानंतर तिला अनेक अडचणींना तोंड द्याव लागले. तिने वडील गेल्यानंतर अनेक कठीण प्रसंगाचा सामना केला. आज मागे वळून बघताना तिला फार समाधान मिळते की तिने कुटुंबासाठी केलेल्या मेहनतीच चीझ झाले. भूमी म्हणते, आज तिला जे काही यश मिळाले आहे ते तिच्या वडिलांचा आर्शीवाद आहे.

तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया, सांड का आँख व पति पत्नी और वो यासारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
 

Web Title: Bhumi pednekar reveals she lost her father to cancer at an early age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.