Join us

काय सांगता ! महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये चक्क भुवन बाम होणार स्किटमध्ये सहभागी, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 11:45 IST

महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये युट्यूब स्टार भुवन बाम (Bhuvan Bam) आणि अभिनेता अनुप सोनी (Anup Soni) हे हजेरी लावणार आहेत.

 सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सर्वांचाच आवडता झाला आहे. मोठंमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावतायत. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांच्या नंतर नुकतीच सुबोध भावे, पूजा सावंत आणि सुभाष घई हे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर येऊन गेले.  

 या प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत येत्या आठवड्यात युट्यूब स्टार भुवन बाम आणि अभिनेता अनुप सोनी हे हजेरी लावणार आहेत. देशविदेशात भुवन बाम याचे चाहते आहेत. आपल्या 'धिंडोरा' नावाच्या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी भुवन आणि अनुप हे दोघे महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये आले होते. अनुप सोनीच्या आई हास्यजत्रा अगदी आवडीने बघतात असं अनुप सोनी म्हणाले तर या सर्व कलाकारांना लाइव्ह परफॉर्म करताना पाहणं आणि त्यांची ही धमाल अनुभवणं खूप छान आहे असं भुवन यावेळी म्हणाला. 

 एवढंच नाही तर भुवनने एका स्किटमध्ये सहभागी होत मंचावर सादरीकरण देखील केलं. प्रसाद, नम्रता आणि विशाखा या दिगज्ज हास्यकलाकारांबरोबर भुवननी हे सादरीकरण केलं आहे.  ही सर्व धमाल प्रेक्षकांना  गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :अनुप सोनी