Join us

Bigg Boss Marathi 3 : 'अविष्कार कलिंगड, पण स्नेहा म्हणजे...'; जय दुधाणेने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:33 IST

Bigg Boss Marathi 3: जयने एका मुलाखतीत बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचं एका शब्दात वर्णन केलं आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या बिग बॉस मराठीचं तिसरं (Bigg Boss Marathi 3) पर्व नुकतंच संपलं. या पर्वात विशाल निकम (vishal nikam) हा विजेता ठरला आहे. तर, जय दुधाणे  (jay dudhane)उपविजेता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या दोघांचीही चर्चा रंगली आहे. यामध्येच जय अन्य एका कारणासाठीही चर्चेत येत आहे. जय लवकरच महेश मांजरेकर (mahesh manjarekar) यांच्या आगामी 'शनिवार वाडा' या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच जयने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचं एका शब्दात वर्ण केलं आहे. यावेळी त्याने अविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघला दिलेली उपमा पाहून अनेक जण थक्क झाले आहेत.

जयने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचं एका शब्दात वर्णन करायचं होतं. यावेळी त्याने प्रत्येकाला विशिष्ट नावाची उपमा दिली. यात विशाल निकम 'रांगडा गडी' आहे असं तो म्हणाला. तर, आदिश वैद्य 'टॉमी' आहे. सोबतच तृप्ती देसाई म्हणजे 'एक नारी सभपे भारी'..असं म्हणत त्याने मीराला 'स्वीट हार्ट' म्हटलं.

दरम्यान, यावेळी तो विकास पाटील झोपाळू आहे असं सांगितलं. सोबतच अविष्कार दारव्हेकर कलिंगड आहे आणि स्नेहा वाघ म्हणजे बबली असं म्हणत त्याने स्नेहाविषयी त्याचं मत मांडलं. बिग बॉस मराठी ३ चा जय उपविजेता जरी ठरला असला तरीदेखील त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या चाहत्यांसाठी तोच विजेता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीविशाल निकममहेश मांजरेकर स्रेहा वाघटिव्ही कलाकार