Join us  

Bigg Boss 12 Update: अनुप जलोटा यांची प्रेयसी जसलीन मथारू होती गर्भवती, केला होता गर्भपात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 2:35 PM

Bigg Boss 12 Update: अनिशा सिंह शर्मा या अभिनेत्रीने नुकतीच इंडिया स्कूप्स या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत.

बिग बॉस 12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची. होय, ही जोडी आहे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या तीन वर्षांपासून स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. आता अनुप आणि त्यांची गलफ्रेंड जसलीन यांच्या नात्याविषयी छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने धक्कादायक माहिती एका वेबसाईटला दिली आहे.

अनिशा सिंह शर्मा या अभिनेत्रीने नुकतीच इंडिया स्कूप्स या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. अनिशाने म्हटले आहे की, अनुप यांनी मला मालिकेत चांगली भूमिका देण्यासाठी माझ्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती. मला बिग बॉस मध्ये घेऊन जाणार असे देखील त्यांनी मला सांगितले होते. एवढेच नव्हे तर जसलीन आणि त्यांच्यातील सगळ्या गोष्टी ते मला सांगतात.

जसलीन आणि अनूप यांच्या नात्याविषयी एक खुलासा देखील तिने केला आहे. तिने सांगितले आहे की, जसलीन गेल्या वर्षी गरोदर होती. यावरून तिच्यात आणि अनुप यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. तिने त्यानंतर गर्भपात केला असल्याचे मला काही दिवसांनंतर कळले होते. जसलीन अनूप यांना फसवत असल्याची भीती देखील नेहमीच त्यांच्या मनात आहे. तिचा लंडनमध्ये प्रियकर असल्याचा त्यांना संशय आहे. पण असे काहीही नसल्याचे जसलीनने अनेकवेळा त्यांना सांगितले आहे.

अनीशाने या मुलाखतीत हे देखील सांगितले आहे की, मी या गोष्टी कोणाला सांगितल्यास माझी हत्या केली जाईल अशी धमकी देखील मला त्यांनी दिली होती.

जसलीनने बिग बॉस 12 च्या घरात प्रवेश करताना सांगितले होते की, ती गेल्या तीन वर्षांपासून अनूप यांना डेट करतेय. इतकी वर्षे त्यांनी ही रिलेशनशिप जगाच्या नजरेपासून लपवून ठेवली होती.

टॅग्स :बिग बॉस 12जसलीन मथारू