पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते करतांना सेलिब्रेटींना आपण ब-याचदा पाहिलंय...पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात असे अनेक उदाहरणे आजपर्यंत वेळोवेळी समोर आले आहे.नुकताच सुरू झाले बिग बॉस 12 सिझन खुप चर्चेत आहे. सगळ्यात जास्त वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे पाहायले जाते. त्यामुळे या घरात राहून बाहेरच्या जगातही आपली सतत चर्चा कशी राहणार, सतत लाइमलाइमटमध्ये राहण्यासाठीच घरातले स्पर्धक वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. यातं सगळ्यात हटके कपल म्हणजे भजनसम्राट अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू याच्या रिलेशिपमुळे खूप चर्चेत आहेत. बघावं तिथे या दोघांवर चर्चा होताना दिसते. एकीकडे अनुप जलोटा आणि जसलीन यांच्यात जवळीक असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आणखीन एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हीडीओ जसलीन मथारूचा. त्यात ती बॉयफ्रेंडच्या शोधात असून सिंगल असल्याचे म्हणताना दिसते. तिचे कोणाबरोबरही लिंकअप नसून ती सिंगल असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट होतंय.
एकीकडे हा व्हिडीओत ती प्रेमाच्या शोधात असल्याचे समजत असून आता अचानक बिग बॉसच्या घरात एंट्री झाल्यामुळे ती अनुप जलोटासह नात्यात असल्याचे दोघेही सांगताना दिसतात. त्यामुळे हे सगळे काही फक्त आणि फक्त पब्लिसिटी करण्यासाठी सारे हतखंडे आजमावण्यात येत असल्याचेही चर्चा आहेत.मात्र असे पब्लिसिटी स्टंट करून चर्चेत राहणे हे काही नवीन नाही त्यामुळे ये पब्लिक है ये सब जानती है.....असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
मुळात ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या तीन वर्षांपासून स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे.
जसलीनच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी त्या दोघांच्या नात्याला कधीच संमती देऊ शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर राहाणेच पसंत करेन. मी काही वर्षांपूर्वी जसलीनची अनूप यांच्याशी ओळख करून दिली होती. तिच्या गायनाचे कौशल्य सुधारण्यात ते तिला मदत करतील असे आम्हाला वाटले होते. पण त्यांच्यात काही सुरू आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. ते बिग बॉस या कार्यक्रमात हजेरी लावणार याबद्दल जसलीनने आम्हाला सांगितले होते. पण ते दोघे गुरू-शिष्य म्हणून कार्यक्रमात सामील होणार असे सांगण्यात आले होते. पण कार्यक्रमात दाखल होण्यापूर्वी नॅशनल टिव्हीवर त्यांनी सगळ्यांना जी गोष्ट सांगितली, ती ऐकून आम्हाला धक्काच बसला असल्याचे त्यांनी सांगितले.