हिंदी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसचा बारावा सीझन नुकताच सुरू झाला. या सीझनमधील अनुप जलोटा व त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू ही जोडी चांगलीच चर्चेत आली आहे. या दोघांच्या वयात सदतीस अंतर असल्यामुळे ते सगळ्यांच्या नजरेत आले आहेत. नुकताच प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये अनुप जलोटा गर्लफ्रेंड जसलीनसाठी रोमँटिक होताना दिसले.
बिग बॉसच्या घरात जास्त स्पर्धक किचनमध्ये काम करत होते. तिथे जसलीनदेखील होती. तिथे सौरभदेखील आला आणि त्याने जसलीनला विचारले की तू आज मला गुलाबी रंगाचे कपडे का परिधान करायला सांगितले? त्यावर जसलीन म्हणाली की आज गुलाबी रंग लकी आहे. सौरभ व जसलीनची चर्चा अनूप जलोटा ऐकून म्हणाले की, लोक तुला पाहून गुलाबी रंगाचे कपडे परिधान करण्याचा विचार करतात. तु जे करते ते सगळे करतात. त्यानंतर ते रोमँटिक अंदाजात गाणे गात म्हणाले की, ' जो तुमको हो पसंद वही बात करेंगे। तुम टमाटर को कहो प्याज तो हम प्याज कहेंगे।' हे ऐकून जसलीन लाजली व म्हणाली, 'सो स्वीट'
अनूप जलोटा व जसलीन मथारू यांच्यामध्ये 37 वर्षांचे अंतर आहे. बिग बॉसमध्ये हे दोघे सहभागी झाल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलचा खुलासा झाला तेव्हा सगळे हैराण झाले होते. या दोघांच्या नात्याबद्दल समजल्यावर घरातल्यांनी आक्षेप घेतला होता. जसलीनचे वडील नाराज झाले होते. ते म्हणाले की, मला त्यांच्या नात्याबद्दल काहीच माहित नव्हते. जर हे खरे असेल तर मी जसलीनसोबतचे सर्व नाते संपवून टाकेन.