अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या जोडीने ‘बिग बॉस 12’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे नॅशनल टीव्हीवर जाहिर करून या जोडीने खळबळ उडवली होती. पण ‘बिग बॉस 12’च्या घरात जाताच, या जोडीच्या नात्याला जणू दृष्ट लागलीय. होय, आत्तापर्यंत ‘बिग बॉस 12’घरात अनूप व जसलीनचा हसत-खेळत प्रवास सुरु होता. पण काल झालेल्या एका नॉमिनेशन टास्कने या जोडीच्या नात्यात कायमचा दुरावा निमाण केला. काल झालेल्या या नॉमिनेशन टास्कमध्ये एक सिंगल कंटेस्टंट कुण्या एका जोडीदाराला जायबंदी करणार होता. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला सिंगल कंटेस्टंट सांगेल त्या वस्तूचा त्याग करणे बंधनकारक होते. या टास्कमध्ये दीपिका कक्कडने अनूप जलोटा यांनी बंदी बनवले. यानंतर दीपिकाने अनूप यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांची जोडीदार जसलीनला तिचे सगळे कपडे, मेकअप त्याग करण्यास तसेच केस कापण्यास सांगितले. आधी जसलीनने हे सगळे करण्यास होकार दिला. नंतर नंतर ती पलटली. एक कलाकार या नात्याने कपडे किती महत्त्वाचे आहेत, हे तिने दीपिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दीपिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अखेर जसलीनने कपड्यांचा त्याग करण्यास व केस कापण्यास नकार दिला, झाले, हीच गोष्ट अनूप यांच्या मनाला लागली. तू माझ्यासाठी कपड्यांचा त्याग करू शकत नाहीस? असा प्रश्न त्यांनी जसलीनला केला़ पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
Bigg Boss 12 : काय म्हणता; अनूप जलोटा व जसलीन मथारूचे ब्रेकअप??
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:07 PM