Join us  

Bigg Boss 12: पुन्हा Viral होतोय नेहा पेंडसेचा Pole डान्स,ज्यावर नेटीझन्स म्हणाले होते हा तर आहे 'मल्लखांब'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 3:20 PM

मराठमोळी नेहा बिग बॉस 12 सिझनमध्ये सहभागी झाल्यापासून आपल्या स्टाइल स्टेटमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.

काही कलाकार अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत असतात. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी विविध कलाकार आपलं वेगळेपण जपतात. काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. सध्या मराठमोळी नेहा बिग बॉस 12 सिझनमध्ये सहभागी झाल्यापासून आपल्या स्टाइल स्टेटमेंटने सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसमुळे आता पुन्हा नेहा पेंडसेचे छोट्या पडद्यावर रसिकांना दर्शन घडतंय. तसेच तिचा घरात असलेला बिनधास्त आणि रोकठोक स्वभाव तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस तर आहेच. तर दुसरीकडे ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय काय करते या गोष्टी जाणून घेण्यातही उत्सुक आहेत.

बिग बॉसमुळे नेहा पेंडसे एकीकडे वाहवा मिळवत असताना तिचा जुना व्हीडीओही पुन्हा समोर आला आहे. नेहाचा  हा व्हीडीओ जुना आहे. हा व्हीडीओ पाहून नेटीझन्स मात्र तिची खिल्ली उडवत असल्याचेही पाहायला मिळत आहे.खुद्द नेहानेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती एका गाण्यावर पोल डान्स करताना दिसतेय.हा पोल डान्स करताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत चर्चेचा विषय ठरतोय. कारण ज्या अंदाजात नेहा पेंडसे या व्हिडीओत पोल डान्स करताना दिसते त्या व्हिडीओला पाहून नेटीझन्स मात्र संभ्रमात असल्याचे पाहायला मिळतंय. कारण नेटीझन्स लाईक्स कॉमेटस देत म्हटल आहे की, हा पोल डान्स पेक्षा मल्लखांबच करत असल्याचे जास्त वाटतंय. 

मराठी सिनेमा, मालिका असो किंवा मग हिंदी मालिका या माध्यमातून नेहा पेंडसेने आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सेक्सी आणि मादक अदांमुळे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' मालिकेत नेहा झळकली आणि नेहाचा कधीही न पाहिलेला ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. या मालिकेत नेहाने एका बॉसची भूमिका साकारली होती.तिच्या याभूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.नेहान अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिची भाग्यविधाता ही मराठी मालिका तर प्रचंड गाजली होती. तसेच ती अनेक हिंदी चित्रपटांमध्येदेखील झळकली आहे. सनी देओल आणि महिमा चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या प्यार कोई खेल नही या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.नेहाने गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट-मालिका, हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीत एक यशस्वी अभिनेत्री म्हणून आपली ओळख मिळवल्यानंतर नेहाला काहीतरी वेगळे करायची इच्छा आहे. अनेक वर्षं मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता नेहाला रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा असल्याचे तिने दिलेल्या एका  मुलाखतीत म्हटले होते.

टॅग्स :नेहा पेंडसेबिग बॉस 12