बिग बॉस १३ (Bigg Boss 13) फेम कपल असीम रियाझ (Asim Riyaz) आणि हिमांशी खुराना(Himanshi Khurana)चे ब्रेकअप झाले आहे. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघेही वेगळे झाले आहेत. या वृत्तानंतर असीम आणि हिमांशीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. हिमांशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हिमांशी खुरानाने पोस्ट करत लिहिले की, 'होय, आम्ही आता एकत्र नाही आहोत. आम्ही एकत्र घालवलेला वेळ खूप चांगला होता, पण आता आम्ही एकत्र नाही. आमच्या नात्याचा प्रवास छान होता आणि आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. आपापल्या धर्माचा आदर करत असताना, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक समजुतींमुळे आम्ही आमच्या प्रेमाचा त्याग करत आहोत. आमचे एकमेकांविरुद्ध काहीही नाही. आम्ही तुम्हाला आमच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती करतो. हिमांशी.
हिमांशी आणि असीमला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. चाहते त्यांना 'असिमांशी' म्हणून संबोधायचे. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल व्हायचे. बिग बॉस १३ पासून दोघांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. हिमांशी या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक होती. असीम हिमांशीच्या प्रेमात पडला होता आणि संपूर्ण सीझनमध्ये तिच्यासोबत फ्लर्ट करत असे. त्यावेळी हिमांशी दुसर्यासोबत गुंतली होती. पण नंतर हिमांशीने तिची एंगेजमेंट तोडून असीमसोबत येण्याचा निर्णय घेतला. असीमने बिग बॉसच्या घरातच हिमांशीला प्रपोज केले होते आणि शो सोडल्यानंतरही दोघेही एकत्रच राहिले.