टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो ‘बिग बॉस 13’चा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात हा शो बंद करण्याची मागणी होत असताना आता या वादाची धग ‘बिग बॉस 13’चा होस्ट सलमान खान याच्या घरापर्यंत पोहोचली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच काही लोकांनी सलमानच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केलीत. निदर्शने करणा-या 22 लोकांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.सलमान खान ‘बिग बॉस 13’चा होस्ट आहे. ‘बिग बॉस 13’ सुरु होऊन काही आठवडे होत नाही बोल्ड कंटेन्टमुळे हा शो बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. करणी सेनेनेही हा शो बंद करण्याची मागणी केली आहे. पद्मावत, मणिकर्णिका आणि आर्टिकल 15 या सिनेमानंतर ‘बिग बॉस 13’ हा रिअॅलिटी शो करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या शोमधील कंटेन्ट प्रचंड बोल्ड असून हा शो भारतीय संस्कृतीची पायमल्ली करणारा असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे.
यामुळे विरोधबिग बॉस 13 मध्ये बेड फ्रेन्ड्स फॉरएव्हर या थीममुळे वाद सुरु झाला. या बिग बॉसच्या घरातील महिला स्पर्धकाना पुरूषांसोबत बेड शेअर करणे बंधनकारक होते. याला लोकांनी जोरदार विरोध केला. विरोध वाढताना पाहून बिग बॉसने हा नियम बदलवला. आता कुठलाही स्पर्धक कुणासोबतही बेड शेअर करू शकतो. यानंतर ‘माऊथ टू माऊथ’ म्हणजे हातांचा वापर न करताना केवळ तोंडाने सामग्री पास करण्याचा या शोमधील एक टास्कही वादाच्या भोवºयात सापडला होता. फेस टू फेस नॉमिनेशनलाही लोकांनी विरोधकेलाआहे.