छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉसच्या तेराव्या सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला ठरला आहे. सिद्धार्थ शुक्लासोबतआसिम रियाज व शहनाज गिल हे विजेत्याच्या शर्यतीत होते. मात्र यांना मागे टाकत सिद्धार्थने बाजी मारली आहे. उपविजेत्या पदावर असीम रियाज, शहनाज गिल, रश्मी देसाईला समाधान मानावे लागले आहे.
सुमारे १४० दिवसांहून जास्त काळ बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर बिग बॉस १३च्या विजेतेपदासाठी अंतिम फेरीत सहा सदस्य पोहचले होते. यात सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, आरती सिंग, रश्मी देसाई, पारस छाब्रा व आसिम रियाज यांचा समावेश आहे.
प्रेक्षकांच्या मतांच्या आधारावर सिद्धार्थ शुक्ला या स्पर्धकाने बाजी मारली आहे. चार महिन्याहून अधिक काळ कुटुंबीय व मित्रपरिवारापासून दूर राहिलेल्या या स्पर्धकांसाठी बिग बॉसच्या घरातील प्रवास तितकासा सोप्पा नव्हता. विविध टास्क, बिग बॉसच्या घरात सहकारी सदस्यांसोबत उडणारे वाद, टोकाची भांडणं असे सारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य, त्यांचा स्वभाव व विविध परिस्थितींशी सामना करण्याची त्यांची ताकद यावरून प्रेक्षकांनी बिग बॉसच्या १३व्या सीझनच्या विजेत्याची निवड केली आहे.
'बिग ब्रदर' या रियालिटी शोवर आधारित 'बिग बॉस' या रियालिटी शोच्या विजेत्यांना ट्रॉफी आणि पन्नास लाख रुपये देण्यात येतात. शानदार अंतिम फेरीच्या वेळी धमाकेदार परफॉर्मन्सही सादर झाले.