Join us

Bigg Boss 15: या गैरसमजामुळे तुटले करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरचे नाते, शमिता शेट्टीकडे केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 4:08 PM

Bigg Boss 15: अभिनेता करण कुंद्रा बिग बॉसच्या १५व्या सीझनमधील लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे.

अभिनेता करण कुंद्राबिग बॉसच्या १५व्या सीझनमधील लोकप्रिय सदस्यांपैकी एक आहे. करण आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत खासगी जीवनामुळे नेहमी चर्चेत येत असतो. करण फार कमी वेळेला आपल्या नात्याबद्दल बोलताना दिसते. नुकतेच करण कुंद्रा शमिता शेट्टीकडे आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला. त्याने शमिताकडे आपले मन मोकळे करत त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले आणि त्यावेळी तो भावूक झाला होता.

शमितासोबत बोलताना करण कुंद्रा म्हणाली की, तो स्वतःमध्येच राहणारा व्यक्ती आहे आणि जे काही त्याच्या मनात असते ते तो त्याच्याकडे ठेवतो. पण यासोबत करणने त्याची एक्स गर्लफ्रेंड अनुषाबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला. करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर जर एकमेकांशी बोलले असते आणि तिच्या समस्यांबद्दल सांगितले असते तर कदाचित ब्रेकअप झाले नसते. त्याने अनुषाचे नाव न घेता म्हटले की ती तिच्या गोष्टी शेअर करत होती पण मी करत नव्हतो.करण कुंद्रा पुढे म्हणाला की, तो त्याच्या मागील नात्यात इतका सहभागी झाला होता की त्याचे अनेक मित्र गमावले. माझे मित्र मंडळींसोबत बोलणेदेखील बंद झाले होते. त्यावर शमिता करणला म्हणाली की, जर अनुषा हा शो बघत असेल तर तिलाही समजेल.त्यावर करण कुंद्रा म्हणाला की, ही गोष्ट तिला कधीच समजणार नाही कारण तिला भडकावणारे बरेच लोक आहेत. मात्र शमिताने त्याला समजावत म्हटले की, त्याने काहीच फरक पडत नाही. जर तुमच्यात प्रेम असेल तर कुणी भडकवले तरी काहीच फरक पडत नाही. तुमचे प्रेमच जिंकते. शमिता पुढे म्हणाली, मी आतापर्यंत ज्यांना डेट केले ते माझ्या घरातल्यांना आवडले नाहीत. त्यामुळे मी समजू शकते.

टॅग्स :बिग बॉसकरण कुंद्राअनुषा दांडेकर