Join us

Bigg Boss 15: आता मला सहन होत नाहीये...; तेजस्वीपासून दूर होऊ इच्छितो करण कुंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 6:13 PM

Bigg Boss 15: करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात नकळत दोघे जवळ आलेत आणि आता काय तर ‘ब्रेकअप’ची भाषा बोलू लागलेत.

Bigg Boss 15:  ‘बिग बॉस 15’मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत कोण असेल तर करण कुंद्रा (Karan Kundrra) व तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash). बिग बॉसच्या घरात आत्तापर्यंत अनेक जोड्या बनल्या. काही घरातच तुटल्या तर काही जणांच्या घराबाहेरही टिकल्या. करण कुंद्रातेजस्वी प्रकाश अशीच एक जोडी. बिग बॉसच्या घरात नकळत दोघे जवळ आलेत आणि आता काय तर ‘ब्रेकअप’ची भाषा बोलू लागलेत.

गेल्या आठवड्यात सलमान खानने (Salman Khan) ‘वीकेंड का वार’मध्ये करण व तेजस्वीच्या नात्यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तू कधी तेजासाठी स्टँड घेतलंस? तिचं आयुष्य कठीण का करतो आहेस? मी म्हणतोय ते लक्षात ठेवा, जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा हे नातं महिनाभरही टिकणार नाही, असं सलमान म्हणाला होता. त्याचे हे शब्द ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला होता.

यानंतर काय तर ताज्या एपिसोडमध्ये करण कुंद्रा तेजस्वीसोबत  नातं संपवण्याबद्दल बोलला. ‘मी आता हे सर्व हाताळू शकत नाहीये. कदाचित मी नाती सांभाळण्याच्या लायकीचाच नाही, असं मला वाटू लागलं आहे. सध्या तरी या घरात मी हे नातं इथेच संपवू इच्छितो. बाहेर जाऊन कसं सांभाळता येतं, ते बघू. तुझ्या काही गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत. ज्यामुळे मी प्रचंड दुखावलो आहे, ’असं करण तेजस्वीला म्हणतो.

करण नातं तोडण्याबद्दल बोलताच तेजस्वी भावुक होते. तू तर आत्तापर्यंत मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलेलं नाही आणि इतक्या लवकर हे नातं तोडण्याचं म्हणतोस, असं ती करणला म्हणते. यावर मला काहीही कळत नाहीये, असं म्हणत करणही भावुक होतो. तेजस्वी त्याचे अश्रू पुसत त्याला आधार देण्याचा प्रयत्न करते. अर्थात हे सगळं रात्री घडतं आणि दिवस उगवताच दोघांमध्ये पुन्हा सगळं काही सुरूळीत होतं. बिग बॉसच्या घरात काहीही होऊ शकतं, असं म्हणतात ते म्हणूनच. 

टॅग्स :बिग बॉसकरण कुंद्रातेजस्वी प्रकाश