Join us

'सेटवर तो कायम...'; कतरिनाचा सलमानवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 5:15 PM

Katrina kaif: कतरिनाने केलेल्या आरोपांनंतर सलमानला सगळ्यांसमोर तिची माफी मागावी लागली. 

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणार शो म्हणजे बिग बॉस (bigg boss). यंदा या शोचं १५ वं सुरु आहे. अलिकडेच या शोमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif), रोहित शेट्टी (rohit shetty) स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी 'सूर्यवंशी' (suryavanshi) या चित्रपटाचं प्रमोशनदेखील केलं. या भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कतरिनाने बिग बॉसच्या सेटवर सलमानवर (Salman Khan) काही आरोप केले आहेत. इतकंच नाही तर या आरोपांनंतर सलमानला सगळ्यांसमोर तिची माफी मागावी लागली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये कतरिना रोहित शेट्टीसमोर सलमानच्या तक्रारींचा पाढा वाचते.सलमानविषयी तुला कोणत्या तक्रारी आहेत?, असं रोहित शेट्टी कतरिनाला विचारतो.

त्यावर, "हे चित्रपटाच्या सेटवर कायम उशीरा येतात. इतकंच नाही तर डान्सच्या वेळी ते कोरिओग्राफर्सच्या स्टेप्स फॉलोसुद्धा करत नाहीत", असा आरोप कतरिना करते. विशेष म्हणजे कतरिनाचा हा आरोप सलमान मान्यदेखील करतो. आणि, त्यानंतर कतरिनासाठी 'ओ मेरे दिल के चैन' या गाण्यावर मजेशीर अंदाजात डान्सही करतो.

दरम्यान, कतरिना आणि सलमान यांच्यातील उत्तम बॉण्डिंग सगळ्यांनाच ठावूक आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.  'युवराज', 'मैंने प्यार क्यूँ किया', 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'भारत' अशा अनेक चित्रपटांमध्ये कतरिना-सलमान हे एकत्र झळकले आहेत. 

टॅग्स :कतरिना कैफसलमान खानबिग बॉससिनेमाटेलिव्हिजनबॉलिवूडरोहित शेट्टी