Join us

Bigg Boss 16:  एमसी स्टॅन आऊट ऑफ कंट्रोल, संतापून ‘या’ स्पर्धकावर उचलला हात, काय मिळणार शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 5:47 PM

Bigg Boss 16 Updates:  शिव ठाकरेवर  हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने अर्चनाची पुनरावृत्ती केल्याचं कळतंय...

Bigg Boss 16 Updates: ‘बिग बॉस’च्या घरात राडे, वाद, भांडणं नवीन नाहीत. ‘बिग बॉस 16’मध्ये (Bigg Boss 16) तर रोज नवे वाद पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे व अर्चना गौतमचा ‘एपिसोड’ गाजला होता.  शिव ठाकरेवर  हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला  बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अर्ध्या रात्री तिला ताबडतोब घराबाहेर काढण्यात आलं होतं. पण अर्चनाला बाहेर काढल्यामुळे बिग बॉसचे चाहते नाराज झाले होते. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अर्चनाला शोमध्ये परत आणण्याची मागणी केली होती. अखेर बिग बॉस मेकर्सला अर्चनाला घरात परत आणावं लागलं होतं.

आता लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने अर्चनाची पुनरावृत्ती केल्याचं कळतंय. होय, एमसी स्टॅनने (MC Stan) रागाच्या भरात  शालीन भनोटवर  (Shalin Bhanot) हात उचलल्याची माहिती आहे. बिग बॉसची बित्तंमबातमी देणाऱ्या ‘द खबरी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, एमसी व शालीन यांच्यात टीना दत्तावरून वाद झाला. टीनाचा पाय मुरगळल्यामुळे शालीन तिचा पाय दाबून तो ठीक करण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यान एमसी स्टॅन टीनाला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतो. टीनाला खूप जास्त त्रास होतोय आणि तिला डॉक्टरची गरज आहे, असं त्याला वाटतं. पण शालीन यामुळे भडकतो आणि दोघांत वाद सुरू होतो. हा वाद इतका विकोपाला जातो की, स्टॅन जवळची वस्तू उचलून शालीनला मारतो.  स्टॅनच्या या कृत्यानंतर बिग बॉस त्याला कन्फेशन रूमममध्ये बोलवतात.

 ‘द खबरी’च्या वृत्तानुसार, स्टॅनला त्याच्या या कृत्यासाठी काय शिक्षा मिळेल, हे वीकेंड का वारमध्येच कळणार आहे. सलमान खान स्टॅनला शिक्षा देणार की आपल्या भाषेत समजवणार हे तर येणारा एपिसोड बघूनच कळेल.

टॅग्स :बिग बॉसकलर्ससलमान खान