Join us

Bigg Boss 16: शालीनच्या ‘चिकन’ प्रेमाला बिग बॉसही वैतागले, सोशल मीडियावरचे मीम्स पाहून तर हसू आवरणार नाही...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 14:00 IST

Bigg Boss 16, Shalin bhanot : चिकनच्या डिमांडवरून सोशल मीडिया युजर्स शालीनची मजा घेताना दिसत आहेत. यावरचे मीम्सही व्हायरल झाले आहेत.

Bigg Boss 16:  सध्या बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. ताजी बातमी आहे ती शालीन भनोटबद्दलची. शालीन भनोट बिग बॉसच्या घरात चिकन हवं आहे आणि त्याला सतत चिकन...चिकन... करताना पाहून बिग बॉस वैतागले आहेत. होय, याचा प्रामो रिलीज झाला आहे.शालीनने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून तो सतत चिकनची डिमांड करताना दिसतो. माझ्या हेल्थ कंडिशनमुळे मला प्रोटीनची गरज असल्याचं तो सांगतो. त्याची गरज लक्षात घेता, बिग बॉस रोज त्याच्यासाठी चिकन पाठवतात. पण ताज्या टास्कनंतर घरात आलेलं चिकन शालीनपर्यंत पोहोचलं नाही. मग काय? शालीनची पुन्हा चिकनसाठी भुणभुण सुरू झाली. त्याने पुन्हा बिग बॉसकडे चिकन पाठवण्याची मागणी केली.

शालीनला दु:खी बघून बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. पण याठिकाणी बिग बॉसने शालीनला एका वाक्यात बजावलं. घराच्या गरजेनुसार चिकन पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा चिकन येणार नाही, असं बिग बॉसने स्पष्ट केलं. यामुळे शालीन संतापल्याचंही पाहायला मिळालं.शालीनच्या वागण्यामुळे अर्चना गौतम चिडलेली प्रोमोमध्ये दिसतेय. तू टीव्ही मालिका करायच्यास ना. बिग बॉसच्या घरात का आलास? मार्केटमध्ये इतके कलाकार होते, यालाच का आणलं? असं ती प्रोमोत म्हणताना दिसते. यासगळ्यात टीना नेहमीप्रमाणे शालीनला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

चिकनच्या डिमांडवरून सोशल मीडिया युजर्सही शालीनची मजा घेताना दिसत आहेत. यावरचे मीम्सही व्हायरल झाले आहेत. शालीन भनोटने कुलवधु, सात फेरे-सलोनी का सफर, नागीन, दिल मिल गए या मालिकेत काम केलं आहे. नच बलियेच्या चौथ्या सीझनमध्ये तो झकळला होता. 

टॅग्स :बिग बॉसटेलिव्हिजनटिव्ही कलाकारकलर्स