Bigg Boss 16 PROMO: ‘बिग बॉस 16’ हा टीव्हीवरचा शो सध्या वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. सध्या चर्चा आहे ती टीना दत्ता (Tina Datta ) व श्रीजिता डे ( Sreejita De) या दोघींची. टीना व श्रीजिता या दोघींनी एकत्रच बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. आम्ही दोघी मैत्रिणी आहोत, असा दावा दोघींनी केला होता. पण बिग बॉसच्या घरात काहीदिवस राहिल्यानंतर या दोघींमधली ‘सो कॉल्ड’ मैत्री कधी संपली कळलं देखील नाही. श्रीजिता व टीना दोघींच्या आई एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. पण टीना व श्रीजिता यांच्यात जराही पटत नाही. आता श्रीजिताने टीना दत्ताबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. टीना दत्ता ही घर फोडणारी आहे, ती अटेंशनची भुकेली आहे, असं काय काय श्रीजिता म्हणाली.
बिग बॉसने एक व्हिडीओ रिलीज केला आहे. या श्रीजिता व सौंदर्या टीनाबद्दल बोलत आहेत. ‘टीना मुलांच्या अटेंशनशिवाय राहूच श्कत नाही. तिने अनेकांचं घर संसार उद्धवस्त करण्याचे प्रयत्न केलेत. म्हणूनच अद्याप तिचा स्वत:चा संसार थाटल्या गेला नाही. तुम्ही आतून इतके दु:खी आहात की लोकांना खाली खेचून तुमच्या मनाला शोती मिळते,’असं काय काय श्रीजिता या व्हिडीओत म्हणताना दिसतेय.
श्रीजितावर भडकले लोक...