Bigg Boss 16, Sajid Khan: बिग बॉस १६ मध्ये या आठवड्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. कारण या आठवड्यात एक, दोन नव्हे तर तीन जणांची 'एग्झिट' झाली आहे. श्रीजिता डे आणि अब्दु रोजिक यांच्यानंतर 'बिग बॉस'च्या घरातून साजिद खान देखील बाहेर पडला आहे. बिग बॉसच्या घरात १०० दिवस राहिल्यानंतर साजिदचा स्पर्धेतील प्रवास संपला. साजिद खान बाहेर पडल्यानंतर सर्वच सदस्य भावूक झालेले पाहायला मिळाले.
अब्दु रोजिक घरातून बाहेर झाल्यामुळे बिग बॉसचे फॅन्स खूप उदास झाले होते. यातच आता शोच्या नव्या प्रोमोनं चाहत्यांना धक्का बसला आहे. अब्दू रोजिकनंतर आता साजिद खान देखील बाहेर पडल्यानं घरातील वातावरण खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या रविवारच्या एपिसोडमध्ये साजिद खान बिग बॉसच्या घराला अलविदा करताना पाहायला मिळणार आहे.
बिग बॉसचा निरोप घेताना साजिद खान खूप भावूक झालेला दिसत आहे. घरातून बाहेर पडण्याआधी साजिदनं घरातील सर्व सदस्यांची माफी मागितली आणि त्यांची गळाभेट घेत आभार व्यक्त केले. साजिदच्या एलिमनेशनमुळे सुम्बुल खूप रडताना पाहायला मिळत आहे. कारण घरातील सदस्यांपैकी ती साजिदच्या खूप जवळची मानली जात होती. साजिदनं गेले १०० दिवस सुम्बुल हिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं. निम्रत, शिव, एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम देखील साजिद खान बाहेर गेल्यामुळे खूप भावूक झालेले पाहायला मिळाले.