टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉस १६ (Bigg Boss 16) संपला. पण या शोची चर्चा अजूनही सुरू आहे. होय, बिग बॉस १६ चे टॉप ५ स्पर्धक या ना त्या कारणानं चर्चेत आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत चाललीये. बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन ( MC Stan) याचं तर विचारू नका. लोकप्रियतेच्या बाबतीत त्याने बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींना मागे टाकलं आहे. ऑरमॅक्सने पॉप्युलॅरिटी लिस्ट म्हणजे लोकप्रिय व्यक्तींची यादी जारी केली आहे. जानेवारी २०२३ च्या Most Popular Non-Fiction Personalities यादीमध्ये एमसी स्टॅनने भाईजान सलमान खान याला मागे टाकलं आहे.
होय, या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे कॉमेडी किंग कपिल शर्मा आहे. दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच एमसी स्टॅन आहे. विशेष म्हणजे, भाईजान सलमानचा नंबर त्याच्यानंतरचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका चहर चौधरी तर चौथ्या क्रमांकावर सलमान खान आहे. पाचवा क्रमांक बिग बॉसचा रनरअप शिव ठाकरेनं पटकावला आहे.
एमसी स्टॅनने कोहली व शाहरूख खानलाही मागे टाकलं
बिग बॉसचं १६ हा शो संपला त्या दिवशी साधारण एकाच वेळी एमसी स्टॅन व विराट कोहली यांनी सोशल मीडियावर दोन वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या. एमसी स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी घेतलेला फोटो पोस्ट केला होता. तर विराट कोहलीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कामगिरीचं कौतुक करणारी एक पोस्ट शेअर केली होती. विराट इंस्टाग्रामवर भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा व्यक्ती आहे. पण एकाच वेळी टाकलेल्या त्या पोस्टवर विराटला २० लाख लाईक्स होते तर एमसी स्टॅनला ६० लाख लाईक्स होते. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅन पहिल्यांदाच १६ फेब्रुवारीला रात्री १० वाजता इन्स्टा लाईव्हवर आला. त्याच्या या इन्स्टा लाईव्हनेही इतिहास रचला.
होय, अवघ्या १० मिनिटांत एमसी स्टॅनचे लाइव्ह व्ह्यू पाच लाखांवर पोहाेचले. तो लाइव्ह असताना ५ लाख ४१ हजार लोक त्याला पाहत होते. इतके जास्त व्ह्यूज असणारा एमसी स्टॅन हा पहिला भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. याबाबतीत एमसी स्टॅनने शाहरुख खानला मागे टाकलं. आहे. शाहरुख खानच्या इन्स्टा लाईव्हवर २५५K व्ह्यूज आले आहेत. यावरून एमसी स्टॅनच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही बांधू शकता. सध्या एमसी बिग बॉसच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना दिसत आहे.