छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच चर्चेत राहिलेल्या बिग बॉस 17 (bigg boss 17) चा ग्रँड फिनाले येत्या काही तासांमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष यंदाच्या विनरकडे लागलं आहे. या पर्वाचा विजेता किंवा विजेती कोण असेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. यामध्येच सध्या या शोमधील काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक आणि मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान चर्चेत आली आहे. एका
मुलाखतीमध्ये आयशाने वयाच्या ९ व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचा मोठा खुलासा केला आहे.सध्या सोशल मीडियावर आयशाची एक मुलाखत चर्चेत येत आहे. तिने सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिची आपबिती सांगितली. एका व्यक्तीनेच तिच्याबर बळजबरी करायचा प्रयत्न केला, असं तिने या मुलाखतीत सांगितलं.
काय म्हणाली आयशा?
"त्या व्यक्तीने मला पाठीमागून आवाज दिला. ज्यामुळे मी मागे वळून काय असं विचारलं. त्या व्यक्तीने मला जवळ बोलावलं आणि एक पत्ता विचारला. तो पत्ता मला माहित होता. त्यामुळे, बेटा तू मला तिथे घेऊन चल असं त्यांनी मला सांगितलं. मी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी घेऊन निघाले. आम्ही त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेलो. त्या मजल्यावरुन खाली उतरत असताना त्यांनी मला पायऱ्यांवर ढकललं. आणि, ते माझ्यावर बळजबरी करु लागले. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं. म्हणजे काही तरी चुकीचं घडतंय हे कळत होतं. पण, नेमकं काय ते कळलं नाही", असं आयशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "९ वर्षाच्या मुलीला ते कळेल तरी कसं ना. त्यांनी हाताने माझं तोंड दाबलं होतं त्यामुळे मला ओरडता येत नव्हतं, मी काहीच करु शकत नव्हते.ते मला थांबवायचा प्रयत्न करत होते. मी त्यावेळी फक्त एवढंच बोलत होते की, माझी आई तिथे उभी आहे, काका मला प्लीज जाऊ द्या. पण, त्यांनी मला सोडलं नाही. मात्र, देवाची कृपा त्यांच्या मनात काय आलं माहित नाही. त्यांनी मला एका ठिकाणी दोन मिनिटं थांबायला सांगितलं आणि ते बाहेर जातांना दिसले. मी त्याच वेळी स्वत:ला म्हणाले, आयशा इथून पळ..आणि, मी तिथून निसटले."
दरम्यान, आयशाने बिग बॉस 17 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. आयशा बिग बॉसच्या ग्रँड फिनाले सोहळ्यात दिसणार आहे. परंतु, यावेळी तिने मुनव्वरसोबत परफॉर्म करण्यास नकार दिला आहे.
Bigg boss 17 चे फायनलिस्ट
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), मुनव्वर फारूकी (Munawar Faruqui), मनारा चोप्रा (Mannara Chopra), अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अरुण माशेट्टी (Arun Mashetty).