Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस'च्या घरात ईशा-समर्थला रोमान्स करताना पाहून काम्या पंजाबी भडकली, म्हणाली, "घरातून बाहेर पडा आणि रुम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 16:40 IST

अनेकदा ईशा आणि समर्थ 'बिग बॉस'च्या घरात रोमान्स करताना दिसले. आता टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने यावर प्रतिक्रिया देत एक्सवरुन एक ट्वीट केलं आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'. कलाविश्वातील चमचमते सितारे आणि सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी अनेक युक्त्या लढवताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेलं 'बिग बॉस १७' दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. सिंगल विरुद्ध कपल अशी थीम असलेल्या यंदाच्या पर्वात अभिनेत्री ईशा मालवीयने तिचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक कुमारसह एन्ट्री घेतली होती. त्यानंतर 'बिग बॉस'च्या घरात ईशाचा बॉयफ्रेंड समर्थची एन्ट्री झाली होती. 

काही दिवसांपूर्वीच ईशा आणि समर्थचा 'बिग बॉस'च्या घरातील एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत ईशा आणि समर्थ घरातील बेडरुममध्ये रोमँटिक झालेले दिसत होते. या व्हिडिओनंतर ईशा आणि समर्थला ट्रोलही करण्यात आलं होतं. त्यानंतरही अनेकदा ईशा आणि समर्थ बिग बॉसच्या घरात रोमान्स करताना दिसले. आता टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने यावर प्रतिक्रिया देत एक्सवरुन एक ट्वीट केलं आहे. "थँक्यू ईशा आणि समर्थ...आता मी माझा आवडता शो कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही. या घरातून बाहेर पडा आणि एक रूम शोधा," असं म्हणत काम्या पंजाबीने संताप व्यक्त केला आहे. 

ईशा ही 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. पण, समर्थबरोबरचा 'बिग बॉस'च्या घरातील तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही नाराजी दर्शविली होती. दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरात आता सेलिब्रिटींचा फेव्हरेट असलेल्या ऑरीची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. त्यामुळे पुन्हा घरातील सदस्यांचं समीकरण बदलताना दिसणार आहे.  

टॅग्स :बिग बॉसकाम्या पंजाबीटिव्ही कलाकार