बिग बॉस १७ (Bigg Boss 17)शोच्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानच्या जागी करण जोहर (Karan Johar) शो होस्ट करण्यासाठी येणार आहे. यासोबतच शोचा एक नवीन प्रोमोही समोर आला आहे, ज्यामध्ये करण कुटुंबातील सदस्यांची चांगलीच कानउघडणी करताना दिसत आहे. मुनव्वर आणि अंकिता यांच्यात मैत्रीवरून भांडण होते, त्यामुळे मुनव्वरला दुर्लक्षित असल्यासारखे वाटत होते. अंकिता मन्रारासोबतच्या तिच्या समस्यांबद्दल मनमोकळेपणाने बोलली आणि मुनव्वर तिच्या लहेजावर चर्चा करून स्वतःचा बचाव करताना दिसला.
करण जोहरनेअंकिता लोखंडेला विचारले की, मुन्नवरचे सर्व लक्ष मन्नाराकडे जावे, यासाठी तू स्वतःचे पाऊल मागे घेतलेस का? त्यावर अंकिता म्हणाली की, एक माणूस म्हणून मी खूप इमोशनल व्यक्ती आहे. करण पुढे म्हणाला की, मी असाच आहे, मी इमोशनल आहे. हे सगळं तर आपण फक्त ऐकतो. तुझ्या वर्तणूकीत तर हे गुणदेखील दिसत नाही. अंकिताचा संयम तुटला आणि म्हणाली, सर मुनव्वरपासून लांब राहण्यामागे माझे वेगळे कारण आहे. मी पजेसिव्ह आहे. त्यानंतर करण तिला म्हणाला की, तर मग ही गोष्ट कॉन्फिडन्सने बोल.
यापूर्वीच्या भागात असे दिसून आले होते की अंकिताने मुनव्वरला सांगितले होते की तिला मैत्रीतून एक पाऊल मागे घ्यायचे आहे, ती संभाषण सुरू ठेवेल परंतु प्रत्यक्षात मैत्रीसाठी उपलब्ध नसेल. यानंतर मुनव्वर आणि अंकिता यांच्यात भांडण झाले. यानंतर करणने मन्नारा चोप्रालाही खडेबोल लगावले. करण म्हणाला की तुझं काम फक्त तुझ्या मैत्रीची वैधता मागणं आहे. अनुरागने नॉमिनेट केल्यानंतर मुनावर फारुकीची भूमिका न घेतल्याबद्दल करणने मन्नाराला खडसावले. पुढे करण म्हणाला, 'ही मैत्री आहे का, माझ्या मते हा कपटीपणा आहे.