Bigg Boss १८ Grand Finale: 'बिग बॉस' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिअॅलिटी शो आहे. आज १९ जानेवारी रोजी १८ व्या पर्वाचा शेवटचा दिवस आहे. अभिनेता विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंग, अविनाश मिश्रा, चुम दरंग आणि रजत दलाल हे स्पर्धक या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. दरवेळीप्रमाणे यंदाही बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ग्रँड फिनालेचं होस्टिग करणार आहे.
आज संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या वेळेत 'बिग बॉस'च्या ग्रॅंड फिनालेची ग्रँड पार्टी होणार आहे. अक्षय कुमार हा 'स्काय फोर्स' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस १८' च्या ग्रँड फिनालेमध्ये येणार आहे. तर 'लव्हयापा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि खुशी कपूरदेखील सहभागी होणार आहेत.
निर्मात्यांनी ग्रँड फिनालेचे काही प्रोमो व्हिडीओ जारी केले आहेत. ज्यामध्ये स्पर्धक दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. करणवीर मेहरा आणि चुम दारंग हे शाहिद कपूरच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' गाण्यावर रोमँटिक डान्स करणार आहेत. तर रजत दलाल आणि चाहत पांडे यांचा परफॉर्मन्स असणार आहे. दोघेही गोविंदाच्या 'तुम तो धोकेबाज हो' या गाण्यावर परफॉर्म करताना पाहायला मिळतील.
'बिग बाॅस १८'च्या बक्षीस रकमेबद्दल बोलताना मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सीझनच्या विजेत्याला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे ४०ते ५० लाख रुपयांचा चेक दिला जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेंडनुसार, रजत दलाल आणि विवियन डिसेना या दोघांपैकी एक जाण 'बिग बाॅस १८'ची ट्रॉफी जिंकू शकते, असा अंदाज चाहते लावत आहेत.