Bigg Boss 18: बिग बॉस हिंदीचं नवं पर्व सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच गुणरत्न सदावर्ते चर्चेत आहेत. सदावर्ते त्यांच्या हटके स्टाइलने प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करत आहेत. पहिल्या आठवड्यातील वीकेंड का वारला सदस्यांना खास सरप्राइज मिळालं. बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतबिग बॉसच्या घरात आली होती. 'विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ' या सिनेमाच्या प्रमोशननिमित्त आलेल्या मल्लिकाला पाहून सदस्यही आनंदी झाले.
मल्लिका तिच्या दिलखेचक अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. बिग बॉसच्या घरात आलेल्या या मर्डर गर्लवर गुणरत्न सदावर्तेही फिदा झाले. मल्लिका गेल्यानंतरही सदावर्ते मात्र घरात तिच्याच बद्दल बोलत असल्याचं दिसत आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ करण वीर सदावर्तेंची फिरकी घेत असल्याचं दिसत आहे. "मल्लिकाला बघून सदावर्ते सरांना वेगळाच आनंद झाला होता", असं करण वीरने म्हटल्यानंतर सदावर्ते लाजत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर ते म्हणतात, "एक वेगळंच फिलिंग येतं".
या व्हिडिओत सदावर्ते मल्लिकाचा हात हातात घेत असल्याचंही दिसत आहे. मल्लिका या व्हिडिओत डान्स करत असल्याचं दिसत आहे. तर तिचा ड्रेसही सदावर्तेंना आवडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "हा ड्रेस मला इतका आवडला की मी असा ड्रेस डिजाईन करून घेणार...Hot Hot Hot", असं सदावर्ते म्हणत आहेत. त्यानंतर विवियन त्यांची फिरकी घेत म्हणतो की, "मग जयश्री वहिनी तु्म्हाला तव्यावर हॉट कोल्ड करेल". त्यानंतर घरातील सगळे सदस्य हसायला लागल्याचं दिसत आहे.