सलमान खानचा (Salman Khan) शो 'बिग बॉस १८' (Bigg Boss १८) सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. प्रत्येक नवीन दिवसासोबत या शोमध्ये एक नवा ड्रामा पाहायला मिळतोय. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला हा शो आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. 'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले पुढील आठवड्यात आहे. घरातील सर्व सदस्य ट्रॉफी जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. अशातच आगामी भागाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये पत्रकार हे घरामध्ये एन्ट्री करणार असून ते स्पर्धकांना खोचक प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहे.
सध्या 'बिग बॉस'च्या घरात रजत दलाल, करणवीर मेहरा, चूम दारंग, इशा सिंग, अविनाश विश्रा, विवियन डीसेना आणि शिल्पा शिरोडकर हे स्पर्धक आहेत. या स्पर्धकांना पत्रकारांच्या तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. सर्वांत पहिल्यांदा विवियन डिसेनावर प्रश्नांचा मारा झाला. 'बिग बॉस'च्या घरामध्ये ज्याप्रकारे स्पर्धकांचा प्रवास राहिला आहे, त्याआधारे पत्रकारांना स्पर्धकांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली आहे. यावेळी विवियन डिसेनाला प्रश्न केला की, "तु शोमध्ये आला होता, तेव्हा शोमध्ये खूप मोठा धमाका करणार असं सर्वांना वाटले होते. परंतु ते तसे झाले नाही. तुला वाटतं का तू अशा प्रकारे शो जिंकू शकतोस?" यावर विवियन म्हणाला, "मला जे बरोबर वाटले तेच मी केले आहे".
विवियननंतर चूम दारंग ही पत्रकारांच्या निशाण्यावर आली. एका पत्रकाराने तिला विचारलं, "सर्वांना असं वाटतं आहे की जर करणवीर मेहरा तुझ्यासोबत नसता तर तू आज इथे बसली नसतीस" हे ऐकून करणवीर मेहरा आणि चुम दोघेही स्तब्ध होतात. यानंतर एक पत्रकार इशा सिंगला म्हटलं, "तू नेहमीच तुझे कपडे आणि मॉडर्न राहते. पण, तुझे विचार हे खूप जुन्या काळातले आणि खूप खालच्या स्तराचे विचार आहेत". इशानंतर पत्रकारांनी एका-एका स्पर्धकाला आरसा दाखवला.
आता 'बिग बॉस १८' च्या फिनालेसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. येत्या १९ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १८’चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. ‘बिग बॉस’च्या फॅन क्लबनुसार, करणवीर मेहरा, विवियन डिसेना आणि अविनाश मिश्रा, रजत दलाल आणि चुम दरांग हे पाच अंतिम स्पर्धक 'बिग बॉस'च्या घरात टिकू शकतात. करण आणि विवियन हे दोघेमध्ये ट्रॉफीसाठी अंतिम चुरस रंगू शकते. प्रेक्षक शोच्या विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या सीझनचा विजेता कोण असेल यावर सर्वांचा अंदाज लावला जात आहे.