Bigg Boss 18 Winner: 'बिग बॉस'च्या १८ व्या पर्वाचा विजेता जाहीर झाला आहे. करणवीर मेहरा (Karan Veer Mehra) हा 'बिग बॉस १८'चा विजेता ठरला आहे. यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीवर करणने नाव कोरलं आहे. तर विवियन डिसेना (Vivian Dsena)ने दुसरे स्थान पटकावले. झगमगत्या ट्रॉफीसोबत त्याला बक्षीस स्वरुपात आणखी काय काय मिळालं हे जाणून घेण्याचा प्रयत्न नेटकरी करत आहेत. करणवीर मेहराला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली आहे. बक्षीस स्वरुपात त्याला नेमकी किती रक्कम मिळाली हे जाणून घेऊया.
करणवीर मेहरासाठी हा प्रवास सोपा नव्हता.'बिग बॉस'च्या १८ पर्वाचे टॉप-३ सदस्य विवियन डिसेना, रजत दलाल आणि करणवीर मेहरा ठरले आहेत. त्यानंतर टॉप २ मध्ये विवियन डिसेना आणि करणवीर पोहचले. दोघांमध्ये ट्रॉफीसाठी काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कारण, दोघांचाही मोठा चाहतावर्ग आहे. अखेर विवियन डिसेनाला मात देत करणवीरने ट्रॉफी उचलली. प्रेक्षकांची मिळालेली साथ, चाहत्यांचं प्रेम हे त्याच्यासाठी मोलाचं ठरलं.
'बिग बॉस'च्या १८ पर्वाचा विजेता ठरल्यानं त्याला 50 लाख रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे त्याने याआधी 'खतरों के खिलाडी'च्या १४ व्या पर्वाचंही विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तो 'बिग बॉस १८'च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 'खतरों के खिलाडी 14'नंतर आता 'बिग बॉस १८'चीही ट्रॉफी उचलत करणवीर मेहरानं इतिहास घडवला आहे.. 6 ऑक्टोबर 2024 पासून बिग बॉसचा अठरावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून करण चर्चेत होता. त्यानं शिल्पा शिरोडकरसोबतची मैत्री जपली. तर चुम दरांगसोबतची त्याची केमिस्ट्रीदेखील लोकांना आवडली. शेवटच्या दिवसापर्यंत करणवीर मेहराने त्याच्या खेळाने अनेक लोकांची मने जिंकली. यामुळेच तो या शोचा विजेता बनला. रिपोर्टनुसार 'बिग बॉस १८'मधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक होता.