‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये जबरदस्त राडा घालणारा आणि यानंतर ‘बिग बॉस 15’ गाजवणारा अभिजीत बिचुकलेची ( Abhijeet Bichukale) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही .बिचुकले बोलला की त्याची बातमी होणार म्हणजे होणार! सध्या अभिजीत बिचुकलेने असाच सिक्सर मारला आहे. होय, ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या खास मुलाखतीत बिचुकले बोलला. काय बोलला? तर तुम्हीच वाचा...बिग बॉस मराठीच्या रियुनिअयनमध्ये अभिजीत बिचुकलेची डॅशिंग एन्ट्री झाली आणि पाठोपाठ ‘लोकमत फिल्मी’ला दिलेली त्याची मुलाखतही चर्चेत आली.
मी नाही, यशने मला कॉपी केलं..कुणीतरी मला तिकडे बोललं की, तुम्ही केजीएफची स्टाईल केलीये. तर मी त्यांना सांगू इच्छितो की, मी केजीएफची स्टाईल केलेली नाही. यश नावाचा जो हिरो आहे, तो आत्ता आला. एक दोन चार वर्षांपूर्वी. माझी ही स्टाईल 2001 सालापासून आहे. मी त्या यशची कॉपी केलेली नाही, तर त्याने माझी कॉपी केली, असं बिचुकले म्हणाला.
आय हेट कॉन्ट्रोव्हर्सी...तुम्हाला काही खमंग पाहिजे काय? खमंग म्हणजे काय? तर आय हेट कॉन्ट्रोव्हर्सीज्. कॉन्ट्रोव्हर्सीज् फॉलो मी...असं बिचुकले हसत हसत म्हणाला.
मी नाही, सलमानने माझ्याशी पंगा घेतला...बिग बॉस हिंदीमध्ये भरपूर कॉन्ट्रोव्हर्सीज् झाल्यात.. तुम्ही सलमानसोबत पंगा घेतला... याबद्दल छेडलं असता... कट इट.. कट इट... म्हणत, सलमानने माझ्यासोबत पंगा घेतला. मी नाही घेतला...मी स्वत:हून कधीही कुणाचीही खोडी काढत नाही. मी फक्त रिअॅक्शन देतो. मी फक्त अभ्यास करतो. वेट अॅण्ड वॉच. भोंग्यांवरून जे वादळ उठलंय, त्यात मी पडलोय का? नाही...मी फक्त बघतो. अभ्यास करतो. ही महापुरूषांची भूमी आहे. माझ्या महाराष्ट्रात चाललंय काय? हे मी बघतो आहे. मी उत्तर देणार... और जवाब मिलेगा... करारा जवाब मिलेगा... पण वेट अॅण्ड वॉच. मला या वादात पडायचं नाहीये. माझ्या भूमिकांवर मी ठाम असतो. संपूर्ण समाज एकनिष्ठ राहिला पाहिजे, असंही बिचुकले म्हणाला.
आदर्श लेना है तो मेरा लिजिए... मी बोलतो तसा करतो. मी कॉलेजला असताना बोललो होतो की मी खूप मोठा स्टार बनेल.आज मी आहे. आता मी बोलतोय की मी देशाचा पंतप्रधान बनेल. मी बनणार. है मेरे चेहरे की पहेचान इंडिया में... मे कुछ ना कुछ हू... आदर्श लेना है तो मेरा लिजिए...