Join us

सिद्धू मुसेवालासारखी Bigg boss फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; 10 लाखांच्या खंडणीची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:50 PM

Manu punjabi: 'बिग बॉस 10' चा स्पर्धक मनु पंजाबी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मनु पंजाबीने पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार दाखल केली.

 प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड संपूर्ण देशभरात गाजलं. अद्यापही हे प्रकरण विविध कारणामुळे चर्चेत येत आहे. यामध्येच आता 'बिग बॉस 10' फेम (Bigg boss 10) अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तसंच धमकी देणाऱ्यांनी त्याच्याकडे १० लाखांची मागणीदेखील केली आहे. याविषयी या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. 

'बिग बॉस 10' चा स्पर्धक मनु पंजाबी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर मनु पंजाबीने पोलिस ठाणे गाठत रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पंजाबीला धमकी देणाऱ्या व्यक्तीला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीला अटक केल्यानंतर मनु पंजाबीने व्हिडीओ शेअर करत याविषयीची माहिती नेटकऱ्यांना दिली.

मनु पंजाबीने शेअर केला व्हिडीओ

मनु पंजाबीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला.या व्हिडीओमध्ये त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. "एका अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे १० लाखांची मागणी केली. तसंच पैसे न दिल्यास सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणे माझी हत्या करण्यात येईल अशी धमकीदेखील दिली", असं त्याने या व्हिडीओमध्ये सांगितलं. 

पुढे तो म्हणतो, "मला एक मेल आला होता. मेलमध्ये या व्यक्तीने स्वत:ला सिद्धू मुसेवालाचा मारेकरी असल्याचं म्हटलं होतं. तसंच माझ्याकडे १० लाखांची मागणीही केली होती." तसंच त्याने या पोस्टच्या माध्यमातून ऋचा तोमर, एसपी राम सिंह, आनंद श्रीवास्तव, जयपूर पोलीस यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, मनु पंजाबीला धमकीचा मेल पाठवणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीचं नाव कुलवीर सिंग चौहान असं असून त्याला उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथून अटक करण्यात आली.  या व्यक्तीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई टीमचा सदस्य असल्याचं सांगितलं होतं.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉससिद्धू मूसेवाला