पुष्कर जोग पहिल्या बिग बॉस सीजनचा उपविजेता ठरला. फायनलमध्ये पुष्करचा सामना मेघा धाडेशी होता. मात्र त्याला मेघापेक्षा कमी मत मिळाल्याने उपविजेते पदावर त्याला समाधान मागावे लागले. तो आला त्यांने पाहिले त्यांने जिंकले असेच काहीसे म्हणावे लागेल पुष्कर जोगबद्दल. पुष्कर जोग ज्यावेळी बिग बॉसच्या घरात आला त्यावेळी कुणाला कल्पना ही नव्हती की तो शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये जाईल. त्याच 100 दिवसांचा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. पुष्कर पहिल्या दिवसांपासूनच टास्क करताना उजवा ठरला, त्यांने प्रत्येक टास्क प्रामाणिकपणे खेळला. पुष्कर यांनी आपल्या सिनेमामध्ये सुपरहिरोचे काम केले पण तो खऱ्या आयुष्यामध्ये देखील सुपरहिरो आहे हे त्याने त्याच्या बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाने सिद्ध केले. प्रत्येकवेळी पुष्कर त्याने त्याचा सर्वोत्तम खेळ खेळला. पण तरीही कॅप्टनसीने तीनवेळा हुलकावणी दिली.पण तरीही तो कधीही न खचला नाही आणि त्याने त्याचा खेळ सुरु ठेवला. मित्रांना, मोठ्यांना, स्त्रियांना आदर दिला. बिग बॉसच्या घरातील सई आणि पुष्करची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरला. दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना आवडली. बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत सईने तर ही कुबलही केले की जर पुष्करचे लग्न झाले नसते तर मेघा, पुष्कर आणि सई यांची घरात जोडगोळी होती. मात्र शेवटच्या टप्प्यात या मैत्रिला तडा गेला. पुष्कर आणि मेघाचे घरात कडाक्याचे भांडण झाले.
पुष्करने या इंटस्ट्रीत बालकलाकार म्हणून एंट्री घेतली. तो डॉक्टर ही आहे. जबरदस्त, सत्या, राजू आणि शिखर अशा अनेक सिनेमात त्यांने काम केेले आहे.