बिग बॉस मराठीच्या घरामधून काल कोणताच सदस्य घराबाहेर पडला नाही. मात्र मीराला फसवलं… ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असे लिहिले होते. आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे कारणं घरामध्ये एंट्री होणार नव्या सदस्यांची... म्हणजेच स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची.घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले. स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.
आता हे तिघे घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार ? घरातील समीकरण किती बदलणर ? हे हळूहळू कळेलच.नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले, घरात येत आहेत नवीन सदस्य... आणि एंट्री झाली स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची. घरामध्ये एंट्री घेताच स्नेहाने साधला जयवर निशाणा. त्याला सुनावले खडे बोल. स्नेहा म्हणाली, “या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं....”
तुर्तास बिग बॉस मराठीचा हा भाग पाहिल्यानंतर कितने अजीब रिश्ते है यहा पर याच गाण्याच्या ओळी तुम्हालाही आठवतील. कारण दिवसागणिक नाती या घरात बदलल्याचे स्पर्धकांसह रसिकांनीही अनुभवले आहे. म्हणून बिग बॉस मराठीचे घर स्पर्धकांसोबत रसिकांसाठी फुल ऑन सरप्राईज ठरले. आता हे तीन नवे सदस्य घरामध्ये गेल्यावर अजून काय काय घडणार हे पाहणे नक्कीच रंजक असणार आहे.