Join us

बिग बॉस मराठी 2 च्या घरात फावल्या वेळात सदस्य करतात हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 4:43 PM

बिग बॉस मराठी 2 मध्ये टास्क नसताना सदस्य संपूर्ण दिवस या घरामध्ये काय करतात? हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडत असणारच...

ठळक मुद्देघरामध्ये सदस्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे म्हणून व्यायाम शाळेची देखील सोय करण्यात आलेली असते... ज्यामधल्या विविध गोष्टींचा वापर सदस्य त्यांच्या फिटनेससाठी करतात तर काही सदस्य योगा देखील करतात.

बिग बॉसच्या घरात १०० दिवस सदस्य कुठल्याही मनोरंजन साधनांशिवाय कशाप्रकारे राहातात हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच नेहमी पडतो. बिग बॉस कोणत्याही भाषेतले असो, त्याचे नियम हे सारखेच असतात. त्यामुळे हे स्पर्धक मोबाईल, टेलिव्हिजन, वर्तमानपत्र या गोष्टींशिवाय घरात वेळ घालवतात. या गोष्टींविषयी एक दिवस देखील राहाणे आपल्यासाठी कठीण असते. 

बिग बॉसच्या घरात एकदा स्पर्धक आला की, त्याचा बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध नसतो... टास्क नसताना सदस्य संपूर्ण दिवस या घरामध्ये काय करतात? हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना पडत असणारच... या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. तुम्हाला विश्वास बसणार नाही... पण बिग बॉसच्या घरामध्ये विरंगुळ्यासाठी बऱ्याच गोष्टी घडतात. प्रेक्षकांना माहितीच आहे की, बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या दिवसाची सुरुवात ही गाण्याने होते. त्यानंतर घरातील सदस्य त्यांना नेमून दिलेली कामे पार पाडतात... 

घरामध्ये सदस्यांचे स्वास्थ्य निरोगी रहावे म्हणून व्यायाम शाळेची देखील सोय करण्यात आलेली असते... ज्यामधल्या विविध गोष्टींचा वापर सदस्य त्यांच्या फिटनेससाठी करतात तर काही सदस्य योगा देखील करतात. टास्कसाठी प्रत्येक सदस्याचे फिट राहणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे घराच्या आतमध्ये सगळ्या गोष्टींची सोय करण्यात आलेली असते.   

याबरोबरच घरातील सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्वयंपाक घर... जिथे रोज घरातील सदस्य रुचकर जेवण बनवतात... बिग बॉस मराठी 2 मध्ये तर यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये शेफ पराग कान्हेरे आहे. त्यामुळे सदस्यांना नवनवीन डिश खायला मिळत आहेत... इतर सदस्य देखील खूपच चविष्ट खाद्यपदार्थ बनवत असल्याचे आपल्याला कार्यक्रम पाहाताना दिसून येत आहे. बिग बॉसच्या या स्वयंपाक घरामध्ये मिक्सर नसल्याने पाटा वरवंटाचा वापर केला जातो... बिग बॉस मराठी 2 च्या घरामध्ये सुरेखा पुणेकर असताना नृत्य होणार नाही असे अशक्यच... सुरेखा पुणेकर फावल्या वेळात घरातील सदस्यांना लावणी तसेच कथ्थकचे धडे देखील शिकवतात. त्यामुळे या सदस्यांचा दिवस खूपच चांगला जातोय. 

टॅग्स :बिग बॉस मराठीसुरेखा पुणेकर