Join us

बिग बॉस मराठी २: बिग बॉसच्या घरात पहायला मिळतंय लव्हबर्ड्समधील खुल्लमखुल्ला प्रेम!, पहा त्यांचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 18:16 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्यांची चर्चा विशेष रंगते ते सदस्य म्हणजे वीणा आणि शिव

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्यांची चर्चा विशेष रंगते ते सदस्य म्हणजे वीणा आणि शिव... त्यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत आहे.

वीणासाठी शिवने गायलं बेखयाली हे गाणं... या दोघांमधील मैत्री अजूनच दृढ होत जाते आहे... या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही... वीणाला जेव्हा शिवची गरज असते तेव्हा तो तिच्यासाठी खंबीरपणे उभा असतो... आज शिवला वीणाकडून कॉमप्लिमेंट मिळाली आहे.

 वीणा शिवला म्हणाली “तू आज छान दिसतो आहे” त्यावर शिवचे म्हणणे आहे, तू जास्त गोड दिसते आहे एकदम कडक, रापचिक दिसते आहेस. मग वीणाने शिवला सांगितले मी तर गोड आहे तू तर छान आहेस. वीणाचे म्हणणं आहे काल महेश सर म्हणाले जो विजेता असेल त्याला मी परफ्यूम देणार आणि मला माहिती आहे कोणाला मिळणार. वीणाला वाटते ती विजेती आहे आणि तिला परफ्यूम मिळणार आहे.

प्रत्येक आठवड्यामध्ये एका सदस्याला घराबाहेर जाणे अनिवार्य आहे. या आठवड्यामध्ये माधव, हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य नॉमिनेट होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले आणि माधवला बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडावे लागले. शिवानी,हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडला आणि त्यामुळे या तिघींना अश्रू अनावर झाले. माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला. 

तसेच बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर माधवला आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर AV दाखविण्यात आली. "माणूस म्हणून या घरामध्ये खूप छान होतास" तर माधव कधीच डर्टी गेम खेळाला नाही, कधी जास्त दुसऱ्या सदस्यांबाबत बोलला नाही असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.  माधवला एक विशेष अधिकार माधवला दिला, त्याला कोणत्याही एका सदस्याला सेफ करायचे होते आणि त्याने नेहाला सेफ केले.

टॅग्स :बिग बॉस मराठीवीणा जगतापशीव ठाकरेशिवानी सुर्वेमाधव देवचक्के