बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिव ठाकरे आणि वीणा जगतापची मैत्री, त्यांचे एकमेकांवरचे रुसवे फुगवे, त्यांची भांडण, शिवने तिला मनविण्यासाठी केलेल्या यक्ता, बनवलेले ‘हार्टस’ हे सगळेच प्रेक्षकांमध्ये आणि घरच्या सदस्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत. शिव आणि वीणा या दोघांत स्पेशल बॉन्डिंग आहे, हे सगळ्यांचा दिसतेय. पण हे बॉन्डिंग आता वेगळ्याच वळणावर जात असल्याचे दिसतेय. कालच्या एपिसोडमध्ये वीणा शिवचे डोके मांडीवर घेऊन त्याच्या केसाला मसाज करताना दिसली. यावरून बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी फुलतेय, असे मानले जात आहे.
शिवला हिनासोबत पाहिले की, वीणाचा जळफळाट होतो. तो तिच्यासोबत बोलला तरी वीणा रूसून बसते. नुकताच हीना आणि शिवने खुदा जाने आणि पेहेला पेहेला प्यार है या गाण्यावर रोमँटिक डान्स केला. हा डान्स बघण्यासाठी वीणा बाहेर आली आणि त्यामुळे वीणाचा गैरसमज होऊ नये म्हणून त्याने डान्स करण्यास नकार दिला. पण इकड हिना रूसून बसली. ‘ती स्पेशल आहे तर तिच्यासोबत डान्स कर मला नको सांगूस डान्स करायला. तूच मला सांगितलस डान्स करायला म्हणून मी केला’, असे हिना म्हणाली. यावर शिवने हिनाचीही माफी मागितली.