शिवानी सुर्वेला पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस मराठी २’ च्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण प्रेक्षकांची लाडकी शिवानी प्रकृतीच्या कारणांमुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली होती. या आजारपणातून सावरल्यानंतर शिवानी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करत होती. अखेरीस तिच्या प्रयत्नांना यश आले आणि शिवानी सुर्वेची पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली. पण शिवानी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दाखल झाली असली तरी बिग बॉसने तिच्यासमोर एक अट ठेवली आहे.
‘माझे काही हेल्थ इश्शू असल्याने घराच्या बाहेर पडण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. मी घरात जाण्याच्याआधीच माझ्या हेल्थ प्रोब्लेमविषयी बिग बॉस मराठीच्या टीमला कल्पना दिली होती आणि ते देखील मी घरात असताना जमेल तितकी मला मदत करत होते. पण घरात घडलेल्या काही घटनांमुळे मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे माझी तब्येत अधिक बिघडत होती,’असे तिने सांगितले होते.