Join us

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरात आता शिवानी सुर्वेने उचललं हे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 16:18 IST

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे नाव चर्चेचा विषय बनलं आहे.

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले आणि आता पुन्हा हे नाव चर्चेचा विषय बनलं आहे. कारण शिवानी घरामध्ये मागील आठवड्यामध्ये या घरामध्ये परत आली आहे. तीच घरामध्ये अचानक येणं सगळ्याच सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. घरामध्ये आल्या आल्या शिवानीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे. वीणाला समज दिली तर दुसरीकडे माधवला सल्ला दिला तर नेहाच्या मागे खंबीरपणे उभी आहेच.

आता शिवानीने खूप मोठे पाउल उचलले आहे कारण कालच्या भागामध्ये तिने रुपाली आणि किशोरी ताईना असे विचारले की आपण एकत्र खेळू शकतो का ?ती असे देखील म्हणाली हिनाला देखील आपल्या ग्रुपमध्ये आणणे गरजेचे आहे. आता ग्रुपमध्ये की त्यांच्या बाजूने ती हिना, रुपाली आणि किशोरीला घेऊ इच्छित आहे हे कळेलच. यावर एक सेकंदही विचार न करता रुपालीने संमती दिली. 

शिवानीचे म्हणणे होते, आता ग्रुपमध्ये नाही खेळू शकत, जसे आपण ग्रुप मध्ये नॉमिनेट करत होतो... पण आता तस नाही होणार, आपल्या सगळ्यांना स्वत:चा गेम खेळायचा आहे. आपण याआधी कधीच बोललो नाही इतकं, मला तुमच्याकडून काही गोष्टी कळतील, तुम्हांला अजून ओळखता येईल म्हणून एकत्र यावं असे वाटतं आहे. शिवानी असे देखील म्हणाली की, एकटं खेळण्याची वेळ आली किंवा टास्क आला तर तसेच खेळायचे पण आम्ही तुमच्यासोबत नक्कीच लॉयल राहू. शिवानीने सगळ्यांनाच पुढे येणारी आव्हान, काही टास्क या दृष्टीकोनातून स्पष्ट कल्पना दिली.

 

कधी नॉमिनेट करावं लागलं तर ते प्लानिंग नसेल हे समजून घेणं आवश्यक आहे. मला रुपाली आणि किशोरीताईना हे पहिल्या दिवसापासून सांगायचे होते पण वीणाला हे सांगावं असं कधीच नाही वाटलं. पुढे शिवानी म्हणाली, “आपण एकत्र येऊ जस्ट टू एन्जॉय” बाकी काही नाही. किशोरीताईंना शिवानीने हे देखील सांगितले आम्ही आमची मत तुमच्यावर कधीच लादणार नाही आणि जर असं तुम्हांला वाटलं तर आम्हांला सांगा आम्ही पुढे काहीच बोलणार नाही.शिवानी आणि रुपालीमध्ये देखील परत या विषयावर बोलणं झालं, त्यामध्ये शिवानीचं म्हणणं पडलं मी ग्रुपमध्ये नाही म्हणणार पण आपल्याला आपल्या बाजूने एक सदस्य घेणं खूप गरजंचे आहे, आता वीणा येणं शक्यच नाही आणि स्पष्ट सांगायचे झाले तर मला ती नकोच आहे, त्यामुळे हिनाला घ्यावच लागेल”. रुपालीने शिवानीला सांगितले की हिनाचे असे म्हणणे आहे ती ज्या काही गोष्टी मला सांगेल ते त्यांना सांगू नको. त्यामुळे आता ती कितपत आपल्या ग्रुपमध्ये येईल मला शंका आहे.आता बघुया शिवानी तयार करू पहात असलेला हा नवा ग्रुप कसा असेल ? किती एकमेकांना पाठींबा देईल ? आणि किती एन्जॉय करेल ?

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वेकिशोरी शहाणेमाधव देवचक्के