बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या मर्डर मिस्ट्री या साप्ताहिक कार्यामध्ये काल वैशाली आणि शिवचा सांकेतिक खून करण्यात शिवानी यशस्वी ठरली. आज बघूया घरामध्ये शिवानी आणि नेहा मिळून कोणाचा खून करणार आहे. काल बिग बॉस यांनी शिवला सामान्य नागरिक बनवून नेहाला खूनी केले आणि तशी सूचना अभिजीत केळकरला देखील दिली.
घरामध्ये रुपाली, नेहाची हीनासोबत वादवादी होणार आहे. हीना आणी रुपाली मध्ये किचनच्या कामावरून वाद होताना दिसणार आहे.
हीनाने नेहाला येऊन सांगितलं मला एक पोळी पाहिजे. त्यावर रूपालीचं म्हणणं पडलं लंचची ड्युटी केलीस का तू ? त्यावर हीना म्हणाली मी भांडी घासली लावली नाही जे माझं काम आहे ते मी केलं. त्यावर रूपालीचं म्हणणं पडलं, मी तुला सांगितलं होतं, घासलेली भांडी लावायची, ओटा स्वच्छ करायचा. त्यावर हीनाचं म्हणणं होतं मी ब्रेकफास्टची भांडी मी घासली. रुपाली त्यावर म्हणाली, तू नाही किशोरीताईंनी घासली आणि हीनाचा आवाज चढला. मी घासली आहेत रुपाली तू नाही नको म्हणू. त्यावर रुपालीने हीनाला खडसावले, हळू आवाजात बोल माझ्याशी “नीट बोलायचं माझ्याशी, मी नोकर नाहीये तुझी” आणि हा वाद वाढतच गेला.