Join us

Bigg Boss Marathi 3, Episodes, 5 Nov: गायत्री- मीरा आमनेसामने; पहिल्यांदाच दोघींमध्ये रंगणार 'हे' कार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 12:20 IST

bigg boss marathi 3: बिग बॉसच्या घरात बेस्टफ्रेंड झालेल्या मीरा आणि गायत्री या दोघींमध्ये एक कार्य रंगणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच या दोघी एकमेकींसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या राहणार आहेत.

बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi 3) तिसरं पर्व सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. या एका महिन्यात घरातील स्पर्धकांमध्ये अनेक बदल झाले आहेत. काही स्पर्धकांमध्ये पहिल्या दिवसापासून मतभेद आहेत. तर काही जणांची चांगली गट्टी जमली आहे. यामध्येच बिग बॉसच्या घरात बेस्टफ्रेंड झालेल्या मीरा आणि गायत्री या दोघींमध्ये एक कार्य रंगणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच या दोघी एकमेकींसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या राहणार आहेत.

सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल असल्यामुळे बिग बॉसच्या स्पर्धकांनादेखील दिवाळी अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अवधूत गुप्ते येणार आहे. मात्र, अवधुत गुप्ते आल्यानंतर मीरा- गायत्री यांच्यात कॅप्टन्सीसाठीचं कार्य पार पडणार आहे.

लवकरच बिग बॉसच्या घरात दिवा कॅप्टन्सी हे नवीन कार्य रंगणार आहे. या कार्यात गायत्री आणि मीरा यांची कॅप्टन्सीसाठीचे दोन उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कार्यात घरातील सदस्य कोणाला सपोर्ट करणार ? कोण होणार घराचा नवा कॅप्टन मीरा की गायत्री? हे येत्या भागात लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीगायत्री दातारटेलिव्हिजनटिव्ही कलाकार