Join us

'त्यांच्यासोबत खेळण्याची इच्छा नाही'; उत्कर्ष-जयच्या ग्रुपमधून गायत्रीची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:30 IST

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे घरातील समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे.

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरात “डब्बा गुल” या साप्ताहिक कार्यामुळे घरातील समीकरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. विशाल, सोनाली आणि विकास हे तिघेही मीनलवर नाराज आहेत. तर दुसरीकडे गायत्रीने तिला जय, उत्कर्ष यांच्या टीमसोबत खेळण्याची इच्छा नाही, हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे उत्कर्ष, जय, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप तुटला आहे. 

सध्या बिग बॉसच्या घरात झालेले ग्रुप्स तुटतांना दिसत आहेत. अनेक स्पर्धक दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्या ग्रुप मेंबरची चुगली करताना दिसत आहेत. त्यामुळे आता घरातले हे ग्रुप्स तुटल्याचं पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi 3, Episodes, 5 Nov:  गायत्री- मीरा आमनेसामने; पहिल्यांदाच दोघींमध्ये रंगणार 'हे' कार्य 

स्नेहा आणि तृप्ती देसाईंमध्ये काही तरी बिनसलं आहे. ज्यामुळे त्या इतरांना एकमेकींच्या विरुद्ध काही ना काही सांगत आहेत. तृप्ती देसाई मीरा आणि गायत्रीला सांगताना दिसणार आहेत, 'ते सगळेच स्वत:साठी खेळत होते'. मीरा त्यावर म्हणाली, 'ते सगळ्यात आधी स्वत:चा विचार करतात'. तृप्ती देसाई म्हणाल्या, 'मला माहिती नव्हतं पहिले नावं कोणाचे... आपलं देखील काहीही ठरलेलं नव्हतं'. 

दरम्यान, सध्या घरातील प्रत्येक स्पर्धक आता स्वत: साठी खेळताना दिसत आहे. त्यामुळे गायत्रीनेदेखील तिला जय, उत्कर्ष यांच्या टीमसोबत खेळण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :गायत्री दातारबिग बॉस मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार