Join us

Bigg Boss Marathi 3: मी तुझा छळ केल्याचा एक तरी पुरावा देशील का? स्रेहा वाघचा दुसरा पती भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:07 IST

Bigg Boss Marathi 3: शो सुरू होऊन उणेपुरे तीन दिवस होत नाही तोच, ‘बिग बॉस मराठी 3’चे स्पर्धक चर्चेत आले आहेत. सर्वाधिक चर्चेत आहे ती, अभिनेत्री स्रेहा वाघ

ठळक मुद्देस्रेहाची ही जुनी मुलाखत पाहून अभिनेत्री काम्या पंजाबी ही सुद्धा भडकली आहे

बिग बॉस मराठी’चा तिसरा सीझन (Bigg Boss Marathi 3) चांगलाच गाजणार, हे आताश: सिद्ध झालंय. शो सुरू होऊन उणेपुरे तीन दिवस होत नाही तोच, ‘बिग बॉस मराठी 3’चे स्पर्धक चर्चेत आले आहेत. सर्वाधिक चर्चेत आहे ती, अभिनेत्री स्रेहा वाघ (Sneha Wagh). होय, मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेल्या स्रेहाची सध्या जोरदार चर्चा आहे. कारणही तसंच आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती अविष्कार दारव्हेकर हा देखील ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये सहभागी झाला आहे. वयाच्या 19 व्या वर्षी स्रेहाने अविष्कारशी लग्न केलं होतं. मात्र हा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर 2015 मध्ये स्नेहाने अनुराग सोलंकीशी ( Anurag Solanki ) दुस-यांदा लग्न केले. मात्र लग्नाच्या आठ महिन्यांनंतर अनुराग आणि स्नेहानाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

आता हीच स्रेहा बिग बॉसच्या घरात आहे म्हटल्यावर तिची  एक जुनी मुलाखत व्हायरल होतेय. यात ती आपल्या दोन्ही अपयशी ठरलेल्या लग्नाबद्दल बोलताना दिसतेय. ‘ दोन अपयशी विवाहांनंतर, मला समजले की पुरुषांना जिद्दी महिला आवडत नाहीत. माझा स्वभाव खूप मृदू आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळेही मी घाबरते,’ असं बरंच काही स्रेहा म्हणाली होती. यानंतर पहिल्या पतीप्रमाणेच दुस-या पतीने म्हणजे अनुराग सोलंकीने  स्रेहाचा छळ केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

आता या चर्चांवर अनुरागने प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेमसाठी लोकं कोणत्याही थराला जातात हे पाहून मला धक्काच बसला. मला यावर काहीच बोलायचे नाही पण स्नेहा एक विनंती आहे की जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा मी तुझा छळ केला याचे काही पुरावे असतील तर ते जगाला दाखव,’ या आशयाचे संतप्त  ट्वीट त्याने केलं आहे.

काम्या पंजाबीही भडकलीस्रेहाची ही जुनी मुलाखत पाहून अभिनेत्री काम्या पंजाबी ही सुद्धा भडकली आहे. तुला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं होतं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यानुसार तू आलीस सुद्धा. पण, विक्टीम कार्ड कशाला खेळतेस? तुझ्या पहिल्या लग्नाविषयी काही कल्पना नाही. पण, निदान तुझ्या दुसºया लग्नाविषयी तरी काहीही काहाण्या करुन सांगू नकोस. ते सुद्धा केवळ या चार दिवसांच्या खेळासाठी. तुला चांगलंच माहितीये मी सत्य बाहेर आणू शकते. अशा वाईट पद्धतीने खेळू नकोस, असं ट्विट करत काम्याने स्नेहाला फटकारलं आहे. 

टॅग्स :स्रेहा वाघबिग बॉस मराठी